Mumbai Fire News : मुंबईच्या दहिसर पश्चिमेत मेघा पार्टी हॉलमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास मेघा पार्टी हॉलमध्ये ही मोठी आग लागली आहे. मेघा पार्टी हॉलच्या समोर शिवसेना शिंदे गटाकडून दहिसर रिवर फेस्टिवल कार्यक्रम सुरू आहे. यात दहिसर रिवर फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळामध्ये येणार आहेत. मात्र अचानक आग लागल्यामुळे मोठा संख्येनं दहिसर फेस्टिवलमध्ये आलेल्या लोकांमध्ये धावपळ सुरु झाली आहे.
अग्निशामन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल
दरम्यान, आगीच्या माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगी मध्ये अद्याप कुठल्याही जीवितहानी झाली नसून मात्र संपूर्ण हॉल जळून खाक झाला आहे. मात्र आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास एम एच बी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
जोगेश्वरीमध्येही इमारतीला भीषण आग
शहरात आगीच्या घटना सतत घडत आहेत. ताज्या घटनेत जोगेश्वरी (Jogeshwari Fire) परिसरातील एका इमारतीत भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ही आग इमारतीच्या चार मजल्यांपर्यंत पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर (Jogeshwari Fire) अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. या आगीमध्ये अनेक जण अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जोगेश्वरी मध्ये जेएमएस बिजनेस पार्क इमारतीमध्ये लागली आग तब्बल 4 तासानंतर आटोक्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मोठी चुकीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.(Jogeshwari Fire)
इमारतीमध्ये ओसी नसताना पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इमारतीमध्ये ओसी (OC) नसताना मोठा संख्येमध्ये लोकं भाड्याने गोदाम आणि दुकान घेऊन ते चाललत होते. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या 16 ते 17 लोकांना या आगीमधून सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. ओशिवरा पोलीस आग कशामुळे लागली, ओसी (OC) नसताना विकासकाने इमारतीमधील दुकान भाड्याने कशी दिली, त्याचसोबत यामध्ये पालिकेने का दुर्लक्ष केलं या संदर्भात अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Jogeshwari Fire : 10 व्या मजल्यावरुन ओरडले, कपड्यांना लपटून घेतले; जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरचे 4 मजले जळून खाक, 17 जणांची सुटका, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा