
Raigad Varandha ghat Accident News: रायगडच्या वरंध घाटात बुधवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रायगड आणि पुणे (Pune News) जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध भोर घाटात एका मोटरसायकल स्वार चालकाचा 100 फूट वरून कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. हा तरुण मुंबई वरून भोर तालुक्यातील शिळींब या मूळ गावात जात असताना घाटातील (Varandha ghat) साईट पट्टीचा अंदाज न आल्याने गाडी 100 फुट खोल खाली कोसळली. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव शिवाजी डेरे असे होते. ते भोर तालुक्यातील (Bhor News) शिळींब गावाचा रहिवासी होते. त्यांची दुचाकी साईड पट्टी सोडून खाली आल्याने शिवाजी डेरे घसरुन खालच्या रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.घटनास्थळी महाड एमआयडीसीचे (Mahad MIDC) पोलिस दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. (Raigad News)
Mumbai Goa highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर अपघात
मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी लोटे येथे कारला एका कंटेनरने मागून धडक दिली. कंटेनरच्या धडकेत मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फुटबॉलसारखी उडाली. सुदैवाने कोणालाही दुखापत नाही मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले. कारमधील दोन्ही प्रवासी सुखरूप आहेत. कारला मागून ठोकून पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला स्थानिकांनी पाठलाग करून पकडले. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला. (Road Accident news)
Wardha Accident News: वर्ध्याच्या धोत्रा अल्लीपूर मार्गांवर भीषण अपघात
वर्ध्याच्या धोत्रा अल्लीपूर मार्गांवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. धोत्राकडून अल्लीपूरला जाताना उभ्या असलेल्या ट्रकला दिलीय कारने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या धडकेत कारमधील वैभव शिवणकर, निशांत वैद्य, गौरव गावंडे या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. यापैकी दोघेजण फोटोग्राफर होते. एका जखमी तरुणावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
राजस्थानमध्ये भाविकांच्या वाहनाला अपघात, देवदर्शन करुन परत येताना अनर्थ, 15 जणांचा जागीच मृत्यू
रायगडच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली, कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला, जागेवरच प्राण सोडले
आणखी वाचा