Headlines

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या



मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघात (Accident) प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे (Railway) स्थानकातील प्रवाशांना बसला असून 20 मिनिटांपासून ट्रेन दादरला थांबून आहेत. त्यामुळे, मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मस्जिद आणि सीएसएमटी (Mumbai) रेल्वे मार्गावर सँडहर्स्ट रोडजवळ हा अपघात झाला. ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते, 3 पुरुष आणि 1 महिला ट्रॅकवरुन चालत असताना अचानक लोकल मागून आली, त्यात त्यांना धडक बसली. अंबरनाथला जाणारी लोकल ट्रेन होती, अशी माहिती आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसला आहे. CSMT वर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत असून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई केल्यानंतर रेल्वे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

प्रवाशी संघटनांचा संताप, गर्दीमुळे अपघात

मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, आणि त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेनं आज आंदोलन केलं. हे आंदोलन आता मागे घेतलं असलं तरी त्याचा परिणाम संध्याकाळपासूनच दिसायला लागला. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. दादर, ठाणे, कुरळा, सीएसएमटी अशा प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा प्रश्न तुमचा आहे, मग त्रास आम्हाला का?” असा सवाल उपस्थित केला आहे. गर्दीमुळे पुन्हा एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण, असा प्रश्नही मुंबईकर विचारत आहेत. प्रवासी संघटनांवर देखील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गर्दीमुळे अपघात घडलयाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आंदोलन का करण्यात आलं?

मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटना आज आंदोलन करत आहेत. यामध्ये NRUM कडून आज संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत, मोटर मन देखील यात सहभागी झाले होते. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या.  रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू आहे, लोकल सोडण्यात यव्या यासाठी बोलणी सुरू केली आहेत. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्या माहितीनुसार लोकल सुरु झाल्या आहेत. आंदोलकांसोबत बोलून गाड्या सुरु केल्या आहेत. डीआरएम, डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आलं, असं स्वप्नील लीला म्हणाले. 

जीआरपीनं अभियत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. आता गाड्या सुरु झाल्या आहेत. पावणे सहा पर्यंत गाड्या थांबल्या होत्या. पावणे सात वाजता पुन्हा लोकल सुरु झाल्या आहेत. त्यामुळं लोकल सेवा उशिरानं सुरु राहील, असं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला म्हणाले.  

मुंब्रा अपघात प्रकरण काय?

9 जूनला मुंब्रा स्थानकाजवळ एक अपघात झाला होता. त्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते. त्या लोकल अपघाताचं कारण रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळं खचलेल्या जागेचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याचं एफआयरमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *