मुंबईत (Mumbai) रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, ज्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. ‘जी पहिली गाडी येईल त्या गाडीतून प्रवास करण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रवाशाचा होता,’ या भावनेतून स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीमुळेच एक भीषण अपघात घडला. CSMT ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून चार महिला प्रवासी खाली पडल्या. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मुंब्रा अपघात प्रकरणी रेल्वे अभियंत्यांवर दाखल झालेल्या FIR विरोधात कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते, ज्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी अनेक लोकल सेवा ठप्प झाल्या. या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर घटनास्थळी उपस्थित आहेत.