कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख, जे इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणून प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या मुली, ज्ञानेश्वरी देशमुखच्या (Dnyaneshwari Deshmukh) शाही साखरपुड्यामुळे वादात सापडले आहेत. लोकांना ‘लग्न साधे करा, खर्च टाळा’ असा उपदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यावर लाखो रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होत आहे. साखरपुड्यातील भव्य सजावट, आणि वधू-वरांसाठी रथातून काढलेली मिरवणूक यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही टीका सुरू झाली. ज्ञानेश्वरीचा साखरपुडा बांधकाम व्यावसायिक साहिल चिलप (Sahil Chilap) यांच्याशी संगमनेरमध्ये पार पडला. या टीकेला उत्तर देताना, ‘आपण बदल करू शकतो हे दाखवण्यासाठीच’ हा सोहळा केल्याचे इंदोरीकर महाराजांनी म्हटले आहे.