
<p><strong>Maharashtra Live Blog Updates: पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawat Pune Land Scam) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल नाही. संगनमत करुन शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. </strong></p>
Source link