Headlines

Mumbai CSMT Protest: आंदोलनाची परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी कारवाई होईलच; रेल्वे अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

Mumbai CSMT Protest: आंदोलनाची परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी कारवाई होईलच; रेल्वे अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Mumbai CSMT Protest: आंदोलनाची परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी कारवाई होईलच; रेल्वे अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती



Mumbai CSMT Protest: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मोठी दुर्घटना घडलीय. यात काल (6 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानक सुरु झाल्या आणि या लोकलने रुळावरुन जाणाऱ्या प्रवाशांना (Mumbai CSMT Local Accident) उडवलं. यात तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे युनियनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

अशातच या प्रकरणावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी माहिती देताना सांगितलंय कि, आंदोलनासंदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी फक्त लेखी पत्र CSMT लोहमार्ग पोलिसांना दिले होते. या पत्रानुसार संघटनेकडून फक्त शांततेत निषेध नोंदवून ते निषेध पत्र DRM यांना देणार असल्याचे कळवले होते. तसेच आंदोलनाची परवानगी त्यांना देण्यात आली होती. ज्यामधे केवळ घोषणाबाजी आणि डीआरएमला निवेदन देणं एवढ्यासाठीच हि परवानगी देण्यात आली होती. मात्र, आंदोलनामुळे प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई कऱण्यात येईल, अशी माहिती डॉ. स्वप्निल नीला यांनी दिलीय.

Dr. Swapnil Neela on Mumbai CSMT Protest: नेमकं काय म्हणाल्या डॉ. स्वप्निल नीला?

अपघात घडला त्याआधी एकूण पाच प्रवासी रेल्वे ट्रकवर चालत होते. त्यातील चार लोकांना इजा झाली. तर यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. जखमीतील दोन प्रवाशांच्या तब्येत सुधारत आहे. मागून येणाऱ्या लोकलची धडक बसली. दरम्यान या प्रकरणी डीआरएमकडे (DRM) पत्र देण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच 45 मिनिटानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होत. अपघात आणि आंदोलन दोन वेगळ्या घटना आहेत. ही जी घटना घडली त्यावेळी प्रवासी ट्रॅकवर चालत होते. त्यामुळे या प्रकरणावर दोषी आंदोलकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्या संदर्भात डिटेल्स अहवाल मागवण्यात आला आहे. अशी माहिती डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली.

Mumbai CSMT Protest: प्रवाशांना यातून त्रास होणे अयोग्य

आंदोलनासंदर्भात आंदोलनाची माहिती केवळ लेटरवर देणे इतकच होतं, कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी होती. पण प्लॅटफॉर्मवर आल्यावर मोटरमन यांना काम करू दिलं नाही. या बाबत आधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती आणि त्यानंतर तपासणी करून मार्ग काढता आला असता. मात्र रेल्वेसोबत संपर्क झाला नाही. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना तपासण्यासाठी बोलवण्यात आलं होत. गुन्हा नोंदवण्याचा आधी रेल्वेसोबत शेअर करून खातरजमा करायला हवी होती. प्रवाशांना यातून त्रास होणे अयोग्य आहे. आपले प्राथमिक ध्येय प्रवाशांची सोय बघणं ही आहे. काल देखील प्रयत्न करून वार्तालापकरून आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न होता. कालच्या अपघातात मृत्यू झाला आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांना मदत करता येईल. असेही डॉ. स्वप्निल नीला म्हणाल्या.

आणखी वाचा 

Mumbai CSMT Protest: सीएसएमटी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलकांचं ते ठरलं नव्हतं; अचानक घोषणाबाजी देत कामबंद करत लोकल गाड्या थांबवल्या अन्…

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *