Headlines

धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप



बीड : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडण केले. तसेच, माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, नार्को टेस्ट करा आणि या घटनेचा तपास सीबीआयकडे द्या, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. मी जात-पात मानणारा नाही, केवळ ओबीसी समाजाच्या (OBC reservation) आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, असं माझं मत आहे, असेही मुंडेंनी म्हटले. आता, धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे माध्यमांसमोर आले असून त्यांनी थेट धन्या म्हणत आणि ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडेंवर पलटवार केला. तसेच, उद्याच मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाही, त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे, हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली, राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही. मला माहिती मिळाली होती मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली. घातपाताच्या प्रकरणात आठ-दहा जण आहेत, त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्याप्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायचं म्हणत असेल तर मी पण नार्कोटेस्ट करुन घ्यायला तयार आहे. उद्या मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार आहे. धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे, आरोप नाही केले. मी असे खुनाचे, घातपात करण्याचे आरोप नाही करु शकत. नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहे असं म्हणायचं. धन्या तू आता पक्का गठला, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषेद थेटऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच, या क्लिपमधील ते 2 आरोपी आहेत, असेही त्यांनी म्हटलं. तुम्ही पैशांसाठी मुळावर उठतात का? समाज इतका कमजोर झाला असं तुम्हाला दाखवायचं का? पण मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय  मुंडेच  खरा  सूत्रधार

हे एक तर माझ्या गाडीच्या मागे गाडी घालणार होते, नाहीतर काही औषधी देणार होते. आरोपीला तातडीने गाडी पाहिजे होती, त्याला ती गाडी आमच्या गाड्यांच्या ताफ्यात घालायची होती. धन्या तूझा संपर्क नाही का? आरोपींचे सीडीआर काढा, मी आता सोडणार नाही, तू माझ्यावर लोकं उठवले, धन्या तू खूप मोठा सूत्रधार आहे. आता सगळे सीडीआर, ड्रोन मॅपिंग आणि नार्को टेस्ट सगळं करण्यासाठी मी तयार आहे. आम्ही शिवाजी महाराजांची वृत्ती मानणारे लोक आहोत, शत्रू आमच्या दारात आला तर आम्ही त्याला पाहुणा मानतो. धनंजय मुंडे तू अजूनपण शहाणा हो, माझ्याकडे धनंजय मुंडेंच्या पण रेकॉर्डिंग आहेत, मी त्या रेकॉर्डिंग बाहेर काढणार नाही. धनंजय मुंडे तू घातपात घडवून आणण्याचे ठरवले होते. या प्रकरणात तूच मुख्य आहेस. देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रिमंडळ तुम्ही याची तपासणी करा, चेक करा याला, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा

अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *