
मुंबई : पार्थ पवार यांच्याकडून मुंढवा येथील वादग्रस्त जमीन शासनाकडे परत करण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंढवा जमीन खरेदी प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्यानं पार्थ पवार जमीन शासनाकडे परत करण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही जमीन शासनाची असल्यानं चौकशी लावण्यात आली होती. ही जमीन पुन्हा शासनाला परत दिली जाऊ शकते अशी शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात राज्य सरकारकडून चौकशी समितीदेखील दाखल करण्यात आली आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.अपर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जणांचा समितीत समावेश आहे. पुढील एका महिन्यात चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरण अंगाशी आल्यानंतर जमीन परत करण्याचं सूचत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात आल्यानंतर मोहोळांनी जमीन परत करण्याचं ठरवलं. जमीन परत केली जाईल यावर ही गोष्ट भागते का? याच्यावर काहीच कारवाई केली जाणार नाही का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलतात ते सत्य आहे, असा विश्वास आहे. वडील म्हणून मुलानं काय केलं त्याची त्यांना कल्पना नसेल. पालकमंत्री म्हणून त्यांच्या निर्दशनास अनेक बाबी आल्या आहेत.त्यातून ही बाब जे देखील त्यांच्यासमोर आली आहे. संविधानिक चौकटीत एक टक्के भागीदार दिग्विजय पाटील आहेत. तर पार्थ पवार 99 टक्के भागीदार आहेत. पालकमंत्री म्हणून एखाद्या माणसानं अशी बाब केली असती तर त्याला मोकळीक मिळेल का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मुळशी तालुक्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन शीतल तेजवाणी यांच्याकडून पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली होती. तो दस्त शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यात झाला होता. या प्रकरणी शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारु या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांकडून पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आणखी वाचा