Mumbai MNS News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार यादी मधील घोळ उघडकीस आणण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. चारकोप मधील मतदार याद्यांमध्ये धक्कादायक प्रकरणानंतर आता वर्सोवा विधानसभेतही मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून मतदार यादीतील घोळ उघडकीस आणण्यात आला आहे. एकाच घरात हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावे असल्याचा प्रकार मनसेने उजेडात आणला आहे. तसेच साडेतीनशे पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाही. याद्या दुरुस्त केल्या नाही तर मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावे मराठीत असणे अपेक्षित असताना काही नावे बंगाली भाषेत
या याद्यांचे अभ्यास करताना मनसैनिकांनी यादी क्रमांक 268 मधील एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मीय मतदार नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. शिवाय साडेतीनशे पेक्षा अधिक मतदारांच्या घराचा पत्ताच उपलब्ध नसल्याची ही गंभीर बाब मनसेकडून उघड करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावे मराठीत असणे अपेक्षित असताना तिथे काही नावे बंगाली भाषेत देखील नोंदवण्यात आली आहे.यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून या याद्या तात्काळ दुरुस्त न झाल्यास मनसे कडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
राहुल गांधी हे देखील सातत्याने अनेक पुरावे सादर करत निवडणूक यादीतील घोळ दाखवत आहेत
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सातत्याने अनेक पुरावे सादर करत निवडणूक यादीतील घोळ दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षासह इतर घटक पक्षांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत राज ठाकरे यांनी आयोगावर तोफ डागली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुंबईसारख्या ठिकाणी मतदारयद्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आणखी वाचा