Headlines

Mumbai News : मुंबईकर ट्रॅफिकच्या कचाट्यातून सुटणार, सरकारने 70 किलोमीटर अंडरग्राऊंड रोड'चा प्लॅन आखला, कुठून कुठपर्यंत असणार? जाणून घ्या सर्वकाही

Mumbai News : मुंबईकर ट्रॅफिकच्या कचाट्यातून सुटणार, सरकारने 70 किलोमीटर अंडरग्राऊंड रोड'चा प्लॅन आखला, कुठून कुठपर्यंत असणार? जाणून घ्या सर्वकाही
Mumbai News : मुंबईकर ट्रॅफिकच्या कचाट्यातून सुटणार, सरकारने 70 किलोमीटर अंडरग्राऊंड रोड'चा प्लॅन आखला, कुठून कुठपर्यंत असणार? जाणून घ्या सर्वकाही



Mumbai Is Planning 70-Kms Underground Tunnel Network : मुंबईकरांना रोजचा वाहतुकीचा त्रास लवकरच इतिहासजमा होऊ शकतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि जोडणी अधिक वेगवान, सुरक्षित आणि शाश्वत करण्यासाठी ‘इंटिग्रेटेड भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून, मुंबईसाठी हे रस्ते आणि मेट्रो नंतरचे तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे.

‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेच्या दिशेने मोठे पाऊल

या अभिनव प्रकल्पांतर्गत मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा मानस आहे. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) आणि एस. व्ही. रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल आणि अवजड वाहनांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल.

तीन टप्प्यांत साकार होणारा 70 किमी लांबीचा प्रकल्प

‘मुंबई इन मिनिट्स’ या स्वप्नवत संकल्पनेच्या दिशेने हे पाऊल निर्णायक मानले जात आहे. प्रकल्पाचे तीन टप्पे खालीलप्रमाणे असतील.

  • पहिला टप्पा – वरळी सी लिंक – बीकेसी – विमानतळ (16 किमी). मुंबई कोस्टल रोडला बीकेसी आणि विमानतळाशी जोडणारा भुयारी मार्ग.
  • दुसरा टप्पा – पूर्व–पश्चिम जोडणी (10 किमी). पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा लघुतम मार्ग.
  • तिसरा टप्पा – उत्तर–दक्षिण जोडणी (44 किमी). संपूर्ण मुंबईतून अखंड भूमिगत मार्ग तयार करून मालवाहतूक आणि प्रवासी प्रवास अधिक जलद करणे.

निविदा प्रक्रिया वेगात

पहिल्या टप्प्यासाठी टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास 30 सप्टेंबर 2025 रोजी मंजुरी देण्यात आली. निविदा प्रक्रिया सुरू असून, 17 नोव्हेंबर 2025 रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत.

नेत्यांची दूरदृष्टी

या भुयारी मार्गाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून रूपांतर तिच्या कार्यक्षम वाहतूक प्रणालीवर अवलंबून आहे. प्रस्तावित भुयारी रस्ता नेटवर्क हे बहुपातळी जोडणीच्या दिशेने मोठे पाऊल आहे. रस्ते, मेट्रो, कोस्टल रोड आणि आता भूमिगत भुयारी रस्त्यांचं जाळं यांच्या एकत्रीकरणामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान बनेल.”

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, “या भुयारी रस्ता नेटवर्कमुळे मुंबईला तिसरी वाहतूक व्यवस्था, भूमिगत प्रवासाचा नवा आयाम, प्राप्त होईल. हे शहराच्या नियोजनातील क्रांतिकारी परिवर्तनाचे प्रतीक आहे. कोस्टल रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेनसोबतचे एकत्रीकरण ‘मुंबई इन मिनिट्स’ या दृष्टीकोनाला साकार करेल.”

डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांचे मत; “भुयारी रस्ता नेटवर्कमुळे मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे नेटवर्क विद्यमान रस्त्यांवरील ताण कमी करून पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणी सशक्त करेल तसेच नव्या नागरी जागा उपलब्ध करून देईल.सध्या या प्रकल्पाचा फक्त सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे, ज्यामध्ये तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाईल.डीपीआर अंतिम होऊन मंजूर झाल्यानंतर, प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या गरजेनुसार आणि भविष्यातील वाढत्या मागणीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.
 
‘स्मार्ट आणि शाश्वत मुंबई’कडे निर्णायक वाटचाल

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे नेटवर्क मुंबईचे भूमिगत एक्सप्रेसवे ठरेल. वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा कालावधी तिन्ही घटकांवर नियंत्रण मिळवत, हे नेटवर्क कोस्टल रोड, मेट्रो आणि महामार्गांसोबत मिळून “मुंबई इन मिनिट्स” या स्वप्नाला साकार करेल. मुंबईकरांसाठी हा केवळ रस्ता नसून भविष्यातील वाहतुकीचे नवे युग ठरणार आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *