Headlines

आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग; डोंबिवलीत भाजपला, तर कांदिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का

आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग; डोंबिवलीत भाजपला, तर कांदिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का
आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग; डोंबिवलीत भाजपला, तर कांदिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का



Maharashtra Politics : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस (Congress), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गट स्वबळाची भाषा बोलू लागले आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती आखली आहे. तर पुण्यात अजित पवार यांनीही स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशातच आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्ष प्रवेशाला मोठी गती प्राप्त झाली आहे.

Dombivli: डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का, माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश 

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी पाहता शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं चित्र आहे. अशातच डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का देण्यात आला असून भाजप नेते विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला. तर अनेक वेळा विकास म्हात्रेंची मनधरणी करण्यात आली होती, मात्र म्हात्रेंची नाराजी दूर झाली नसल्याचे बोललं जातंय. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रेसह इतर स्थानिक पदाधिकारी शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Kandivali : कांदिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

तर दुसरीकडे ऐन पालिका निवडणुकी पूर्वी मुंबईच्या कांदिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा मोठा संख्यामध्ये पुरुष आणि महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सर्व ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यात आले आहे. यावेळी आमचं पक्ष स्ट्रॉंग असल्यामुळे ठाकरे गटात खिंडार पडून आमच्याकडे त्यांच्या मोठा संख्या मध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. त्यासोबत मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलाय.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *