Headlines

BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?

BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?



BMC Election Ward Reservation: मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली.  सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीचा आयोजन मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC Election 2025) बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे या प्रक्रियेला सुरुवात झाली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली. (BMC Election news in Marathi)

त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तर अनुसुचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असतील यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असतील. तर अनुसुचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव असतील त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल. तर ओबीसींसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांची समावेश असेल. तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश, असेल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. दिनांक 14 नोव्हेंबर ते गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

एकूण सदस्यसंख्या 227
महिलांसाठी राखीव  114
अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15  महिला 8
अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक
ओबीसी राखीव 61 महिला 31
सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74

Mumbai Election: मुंबई महापालिकेतील अनुसूचित जमाती करिता आरक्षित प्रभाग कोणते?

प्रभाग क्रमांक -५३
प्रभाग क्रमांक – १२१

Mumbai Ward: मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीकरिता आरक्षित 15 वॉर्ड कोणते?

प्रभाग क्रमांक खालील प्रमाणे -(महिला आरक्षण धरून)

प्रभाग क्रमांक -२६
प्रभाग क्रमांक -९३
प्रभाग क्रमांक -१५१
प्रभाग क्रमांक -१८६
प्रभाग क्रमांक -१४६
प्रभाग क्रमांक -१५२
प्रभाग क्रमांक -१५५
प्रभाग क्रमांक -१४७
प्रभाग क्रमांक -१८९
प्रभाग क्रमांक -११८
प्रभाग क्रमांक -१८३
प्रभाग क्रमांक -२१५
प्रभाग क्रमांक -१४१
प्रभाग क्रमांक -१३३
प्रभाग क्रमांक -१४०

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *