
मुंबई : मध्ये रेल्वेचे (Railway) जनरल मॅनेजर म्हणजेच महाप्रबंधक विजय कुमार यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबई (Mumbai) मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला होता. भारतीय रेल्वे यांत्रिक इंजिनिअर सेवेत त्यांनी 1985 मध्ये सुरुवात केली होती. IRSME च्या 1985 च्या बॅचचे ते अधिकारी होते. मध्य रेल्वेचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते चित्तरंजन लोकोमोटीव्ह वर्क्स येथे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
विजय कुमार यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार झोपेतच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. ह्रयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजय कुमार यांच्या कार्यकाळात सीएलडब्लू म्हणजे चित्तरंजन लोकोमोटीव्ह वर्क्सला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्याच नेतृत्वात सीएलडब्लूने आर्थिक वर्षे 2024-25 मध्ये विश्वस्तरीय विशेषत: असलेल्या 700 लोकोमोटीव्हचे रेकॉर्डब्रेक उत्पादन करत नवा विक्रम रचला होता. दरम्यान, विजय कुमार यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनीही शोक आणि सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
Central Railway General Manager Vijay Kumar passed away due to a cardiac arrest, confirms Central Railway.
(Pic Source: Central Railway) pic.twitter.com/YHCAntXgxU
— ANI (@ANI) November 11, 2025
हेही वाचा
आणखी वाचा