
मुंबई : नवी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर (Delhi Bomb Blast) देशभर छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातली कारवायांना वेग आला आहे. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने (Maharashtra ATS) मुंब्र्यात छापेमारी करून दोन जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अॅनालिसिस केलं जाणार आहे. मुंब्र्यातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक बॉम्ब स्फोट (Red Fort Bomb Blast) झाला. त्यामध्ये 12 जणांचा जीव गेला आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्याच संदर्भात दिवशभर देशातील विविध भागात कारवाई करण्यात आली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ATS raids in Mumbra : एटीएसची मुंब्र्यात छापेमारी
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा परिसरातील चार घरांवर छापेमारी केली. या प्रकरणी एटीएसकडून दोन जणांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अॅनालिसिस केलं जाणार आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे.
‘अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’ (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.
Delhi Red Fort Bomb Blast : दिल्ली प्रकरणाचा तपास एनआयएकडे
दिल्लीतल्या स्फोटाच्या तपासाची सगळी सूत्र आता एनआयएच्या हाती आली आहेत. सोमवारी रात्रीपासूनच दिल्ली स्फोटाप्रकरणी कारवाईने वेग पकडला आहे. स्फोटानंतर एनआयए , एनएनसजी, फॉरेन्सिक, रॅपिड एक्शन फोर्स, सीआरपीएफ, जम्मू-काश्मिर पोलिस अॅक्शन मोडवर आलेत. सोमवारी फरीदाबादमधून अटक करण्यात आलेल्या डॉ. आदिल आणि डॉ. मुझ्झमिलची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Delhi Blast Update : दिल्ली स्फोटाचे डॉक्टर कनेक्शन
लखनौ परिसरात एटीएस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉ. मुजम्मिलचा मित्र डॉ. परवेजच्या घरी छापेमारी केली आणि त्याला अटक केली. डॉ. परवेझ अन्सारी हा या आधी अटक केलेल्या डॉ. शाहीनचा लहान भाऊ असल्याची माहिती समोर आली. कारवाईवेळी पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल आणि काही कागदपत्रं जप्त केले.
तपास यंत्रणांनी आसपासच्या परिसरातल्या जवळपास 100 सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाला वेग दिला. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तपास यंत्रणांची करडी नजर आहे. स्फोट जिथे झाला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मोबाईल फोनचा डंप डेटा गोळा केला जात असल्याची माहिती मिळते. दिल्लीतल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची आणि शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा