
ATS Raids in Mumbra : पुण्यातील अल कायदा (Al-Qaeda) प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे ATS ने सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर इलियास याला अटक केल्यानंतर, महाराष्ट्र ATS ने मुंब्रा (Mumbra) आणि कुर्ला (Kurla) येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत इब्राहीम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. ATSला संशय आहे की, ‘हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता’. अबिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचा तपास केला जाणार आहे. ही कारवाई ‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट’ (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या जुबेर इलियास प्रकरणाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे ATS ने मुंब्रा कोसा येथे इब्राहिम आबिदी यांच्या घरी छापेमारी केली. मुंब्रा येथील घरी छापेमारी केल्यानंतर आबिदीच्या कुर्ला येथील घरावरही ATS ने शोधमोहिम केली. मात्र लाकडाऊननंतर आबिदी याने दुसरं लग्न केलं, ते मुंब्रा येथे रहावयास गेल्यानंतर या कुटुंबियांशी फारसा संबध ठेवला नसल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
ATS raids in Mumbra : एटीएसची इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड
दिल्ली स्फोटांनंतर राज्यातील (Delhi Red Fort Bomb Blast) यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचं धाडसत्र सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. यात शिक्षक असलेल्या इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली. यावेळी घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आलीय. तर पुण्यातील जुबैर हंगरगेकर यांच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने हि कारवाई केली आहे.
अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट संघटेंनेचा समर्थक असल्याचा आणि जिहादचा कथित प्रचार केल्याप्रकरणी हंगरगेकरला अटक झाली होती. मात्र इब्राहिम आबिदींच्या कुटुंबियांकडून या आरोपांचा खंडन करत सांगितलं कि, इब्राहिम आबिदी मदरश्यात उर्दू शिकवत नसून साबू सिद्दीकी महाविद्यालय 35 वर्षापासून प्राध्यापक असल्याची कुटुंबीयांनी माहिती दिलीय. तर सर्च वॉरांट घेऊन आलेल्या पोलिसांना सहकार्य केल्याचा कुटुंबियांकडून दावा करण्यात आला आहे. त्यांच मुंब्र्यात आणि कुर्ल्यात अशी दोन घर असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा