Headlines

Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी



मुंबई : ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील ताज लँड हॉटेलबाहेर राडा झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या (Bhartiya Kamgar Sena) कामगारांना फसवून भाजप प्रणित संघटनेत घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याचं दिसून येतंय.

अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणित संघटना आहे. तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं.

Anil Parab Mumbai Rada : अनिल परबांचा रुद्रावतार

ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी स्वतः अनिल परब त्या ठिकाणी आले. हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनिल परबांना पोलिसांनी अटकाव केला. त्यानंतर अनिल परबांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असं म्हणत त्यांनी पोलिसांना जाब विचारला.

भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काहीच लोकांनीच जावं असं पोलिसांनी सांगितलं. त्याला अनिल परबांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का असं म्हणत अनिल परबांनी संताप व्यक्त केला.

Bhartiya Kamgar Sena : कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप

भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघामध्ये घेतलं जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गोंधळ घातला.

भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यामध्ये शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या फसवून सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *