Headlines

मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका



मुंबई : बिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता मिशन मुंबई (Mumbai) म्हणत भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, असे म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit satam) यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी, त्यांनी ठाकरे बंधूं एकत्र येण्यावरुनही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणारे, संपत्ती लुटणारे, मुंबईकरांवरती डाका टाकणारे हे डाकू आहे, मुंबई महापालिकेवर 25 वर्षांपासून ज्यांनी राज्य केलं, ते डाकू आहेत, असे म्हणत नाव न घेता साटम यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

बिहारच्या ऐतिहासिक विजयाच्या खूप खूप शुभेच्छा, विरोधकांनी  रडीचा डाव मांडला होता. आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि हरलो तर व्होटचोरी असं विरोधक म्हणतात. पण, आम्ही मोदींना साथ देतोय,आणि देत राहू. राहुल गांधी बाहेर जातात तिकडे काय करतात? बिहारने सांगितलं देशाचा पप्पू कोण आहे, तर राहुल गांधी आहेत. महाराष्ट्राचा पप्पू कोण हे वेगळं सांगायला नको, येत्या दोन महिन्यात महाराष्ट्राच्या पप्पूला धडा शिकवू, असे म्हणत अमित साटम यांनी नाव न घेता थेट आमदार आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

तसेच, मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणारे, संपत्ती लुटणारे, मुंबईकरांवरती डाका टाकणारे हे डाकू आहे, मुंबई महापालिकेवर 25 वर्षांपासून ज्यांनी राज्य केलं, ते डाकू आहेत, असे म्हणत नाव न घेता साटम यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिका ही कोणत्या परिवाराची जहागीर नाही. मुंबईची महापालिका तुमच्या घरात काय घडतेय यासाठी नाही, हे मुंबईचे डाकू आहेत, अशा शब्दात अमित साटम यांनी महापालिका निवडणुकांपूर्वीच ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय. 

बिहार निवडणूक ट्रेलर (Bihar election trailor)

बिहारमध्ये अनेक वर्षापासून एनडीएनने विकास केला आहे, बिहार हे बिमारू राज्य होते, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात राज्याचा विकास झालाय. विरोधकांचा रडीचा डाव होता, आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि हरलो तर व्होटचोरी चोरी असं म्हणणाऱ्यांना हा धडा आहे. बिहार चुनाव तो ट्रेलर है, मुंबई महापालिका पिक्चर अभी बाकी है, असे अमित साटम यांनी म्हटले. 

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरूनही टीका (uddhav Thackeray and raj Thackeray)

कोण एकत्र येतंय, कोण एकत्र येत नाही. तर, मागच्या 11 वर्षापासून मुंबईचा विकास कोणी केला हे महत्वाचं. बीडीडी चाळीतील लोकांना 550 स्वेअर फुटाचं घर कोणी दिलं हे महत्वाचं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करुन दिला हे महत्वाचं आहे. 

हेही वाचा

अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये NDA च्या विजयाचं राज’कारण’; मोदी अन् नितीशकुमारांचं अभिनंदन

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *