
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai) क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, याच क्रिकेट पंढरीतील एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत अजिंक्य देसाई बनविरोध अध्यक्ष बनले. तर, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकारण नको म्हणत शरद पवारांनीही या निवडणुकीसाठी महत्त्वाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे, विजयी उमेदवार सध्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आभार मानत आहेत. अजिंक्य नाईक यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर हेही राजभेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर आले होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांसोबत आमदार मिलिंद नार्वेकर हेदेखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले होते. विशेष म्हणजे, मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच म्हणजे 20 वर्षानंतर मिलिंद नार्वेकर हे राज ठाकरेंना प्रत्यक्ष भेटले आहेत. या भेटीत मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरे आणि क्रिकेट संदर्भात काही जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावेळी, राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत क्रिकेटच्या मदतीसाठी त्यांना आश्वासनही दिले. क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.राजकारण बाजूला सारुन एमसीए निवडणुकीत उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांचे अजिंक्य नाईक यांनी यावेळी आभार मानले.
जितेंद्र आव्हाड एमसीएचे उपाध्यक्ष
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतेंद्र आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर, सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पय्याडे यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची या आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल –
उपाध्यक्ष – जितेंद्र आव्हाड 203 विजयी वि. नवीन शेट्टी 155
सचिव – उन्मेष खानविलकर 227 विजयी वि. शाह आलम शेख 129
संयुक्त सचिव – निलेश भोसले 228 विजयी वि. गौरव पय्याडे 128
खजिनदार – अरमान मलिक 237 विजयी वि. सुरेंद्र शेवाळे 119
मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिल मेंबर
भरत किणी 184 विजयी वि. किशोर जैन
MCA Election Final Result : ॲपेक्स कौन्सिल (नऊ विजयी उमेदवार आणि मतं)
कदम विघ्नेश- 242
नदीम मेमन- 198
मिलिंद नार्वेकर- 242
भूषण पाटील- 208
विकास रेपाळे- 185
सूरज समत- 246
सावंत नील- 178
संदीप विचारे- 247
प्रमोद यादव- 186
हेही वाचा
Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले…
आणखी वाचा