
Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचाना नारा देण्यात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार चर्चा रंगली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अवघ्या तीन शब्दांमध्ये काँग्रेसचा निर्णयावर प्रतिक्रिया दिली. आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, तर त्यांचा निर्णय ते घेण्यास समर्थ असल्याचे ठाकरे म्हणाले.
मग तो AI च्या माध्यमातून प्रतिसाद होता का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. माझा पक्ष माझ्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. उद्धव ठाकरे यांनी फार गंभीरतेने काँग्रेसच्या स्वबळाचा निर्णय घेतला नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. मत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर खोचक टोला लगावला. ठाकरे म्हणाले की तेजस्वींच्या सभांना मोठा प्रतिसाद लाभत होता. मग तो काय AI च्या माध्यमातून होता का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्या सभांना गर्दी होत नाही ते कसे जिंकले? बिहारचे गणित अनाकलनीय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की या निवडणुकीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयांचा महत्त्वाचा फॅक्टर ठरला असावा. मुख्यमंत्र्याचा चेहरा निवडण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लावण्यात आला होता. त्यामुळे बिहारमध्ये किती वेळ लावणार हे पहाव लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे वक्तव्य मोदी यांचं होतं
वाढीव मतदारांवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, की वाढणारे मतदार कुठून येतात हे पहावं लागेल. आमचा निवडणुकींना विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलंय प्रादेशिक पक्षांच्या मोदींच्या भूमिकेवरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे वक्तव्य मोदी यांचं होतं, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
काँग्रेसचा स्वबळाचा नारा
दरम्यान, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची वाढलेली जवळीक पाहता दोन्ही बंधू एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे, कल्याण डोंबिवली मनपा निवडणुका एकत्र लढतील असे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मनसेला थेट विरोध सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला. दुसरीकडे स्थानिक पातळीवर निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोकळीक दिली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंना साथ देणार का? याची उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा