
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक (Balasaheb Thackeray National Memorial) समितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार नकोत, अशी अट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांनी घातली असून या पदाच्या नियुक्तीला उद्धव ठाकरेंनी जाहीर विरोध केला होता. शिवसेनेतुन फुटून गेलेल्या आमदाराला बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक समितीत स्थान नको म्हणून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोध केला होता. यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांची आता या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचा विरोध बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मध्यस्थी केली. दरम्यान मिलिंद नार्वेकरांच्या (Milind Narvekar) मध्यस्थीनंतर मंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला, अशीही माहिती आहे. त्यामुळे आता शिशिर शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.
Pratap Sarnaik: कलादालन उभे राहिले तितक्याच लवकर राष्ट्रीय स्मारकही उभे राहावं
दुसरीकडे याच मुद्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. बाळ ते बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास दाखवणारे कलादालन उभे करताना काही सत्ताधारी स्थानिक नेत्यानी विरोध केला होता. मोठ्या संघर्षानंतर हे कलादालन उभे राहिले आहे. या कलादालनात विशेषता मातोश्रीतील ती बाळासाहेबांची खोली पाहिली की, अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. माझा राजकिय प्रवासाला सुरूवातही याच खोलीतून झाली. ज्या पद्धतीने हे कलादालन उभे राहिले तितक्याच लवकर राष्ट्रीय स्मारकही उभे रहायला हवे, असे म्हणत मंत्री प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Dadar : दादर येथील स्मृतिस्थळावर शिवसैनिकांसह नेत्यांची अभिवादनासाठी गर्दी
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अगदी सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. यासाठी शिवसैनिकांनी मोठी तयारी स्मृतीस्थळावर केली असून स्मृतीस्थळ फुलांनी सजवले आहे. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील. तसेच अनेक नेत्यांनीही सकाळपासून अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावल्याचे बघायला मिळाले.
आणखी वाचा
आणखी वाचा