Headlines

BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश

BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश


Kalyan Dombivli Mahanagarpalika: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने फासे टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (Kalyan Dombivli Mahanagarpalika Election 2026) अनेक माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून (BJP) प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. गेल्या काही तासांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सरप्राईज देणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार, याची माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळाला या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात धरले. आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी (Shivsena) विशेषत: श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार आणि भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics News)

एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासूनच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष प्रचंड वाढला होता. या दोन्ही पक्षांमधली वाद विकोपालाही गेले होते. गेल्या काही काळात भाजपकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सातत्याने स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यादृष्टीने भाजप पद्धतशीरपणे पावले टाकत असल्याचे सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून कल्याण-डोंबिवली इतर पक्षातील नेत्यांना आयात करुन आपली संघटनात्मक ताकद वाढवली जात आहे. मात्र, मंगळवारी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवकांना गळाला लावल्याने खळबळ उडाली आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *