Headlines

Mumbai News: शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुलांनी समोसा खाल्ला; पोटदुखी, मळमळ, उलट्या, २० विद्यार्थ्यांना विषबाधा, कापूर तेलात पडला अन्…

Mumbai News: शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुलांनी समोसा खाल्ला; पोटदुखी, मळमळ, उलट्या, २० विद्यार्थ्यांना विषबाधा, कापूर  तेलात पडला अन्…
Mumbai News: शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुलांनी समोसा खाल्ला; पोटदुखी, मळमळ, उलट्या, २० विद्यार्थ्यांना विषबाधा, कापूर  तेलात पडला अन्…



मुंबई : घाटकोपर परिसरातील शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा (Mumbai School Food Poisoning) खाल्ल्याने तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांना विषबाधा (Mumbai School Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेत काल  (तारीख.17 सोमवारी) सकाळच्या वेळेत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. विषबाधा झालेले हे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवतील असल्याची माहिती मिळत आहे. त्या दिवशी या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाला त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. हा प्रकार पाहिल्यानंतर घाबरलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले तर काही पालकांनी आपल्या मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.(Mumbai School Food Poisoning) 

शाळेच्या मुख्याध्यापिकेने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आला होता त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन कोणालाही समोसा देऊ नये असे सांगितले होते. मात्र ज्या वेळेस विद्यार्थ्यांना त्रास झाला तेव्हा समजले की,समोसा करताना कोणत्याही शिळ्या भाजीचा वापर झालेला नाही तर समोसा करताना जे तेल वापरले त्यामध्ये देवासमोर ठेवलेला कापूर त्या तेलात पडला होता. सध्या पाच विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पालकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

काल (सोमवारी) सकाळी विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील समोसा खाल्ला, त्यानंतर काही वेळाने मुलांना मळमळ आणि पोटात मळमळ सुरू झाली. ६ विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या यांनी शेजारच्या रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहातील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टर  शाळेत पोहोचले आणि विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरू केले. दरम्यान, इकरा जाफर नियाज सय्यद (११) आणि वैजा गुलाम हुसेन (१०) या दोघांवर राजावाडीत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर राजीव खान (११), आरुष खान (११) व अफजल शेख (११) यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

जेवण बनवताना तेलात अनवधानाने पडला कापूर 

जेवण बनवणाऱ्यांच्याकडून चुकून तेलात कापूर पडला. या तेलातील समोसा खाल्ल्यानेच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या यांनी दिली. शाळेने तत्काळ पालिकेच्या डॉक्टरांना बोलावून विद्यार्थ्यांवर त्वरित उपचार सुरू केले. आता सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे, असे शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी सांगितले. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, शाळांनीही फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र हंगे म्हणाले.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *