Headlines

Shivsena Shinde Camp & BJP: अमित शाह म्हणाले, कुबड्या नको, नाराज शिंदें गटाला विनाशाची कुणकुण लागायला हवी होती, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, 'त्या' 3 घटना जिव्हारी

Shivsena Shinde Camp & BJP: अमित शाह म्हणाले, कुबड्या नको, नाराज शिंदें गटाला विनाशाची कुणकुण लागायला हवी होती, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, 'त्या' 3 घटना जिव्हारी
Shivsena Shinde Camp & BJP: अमित शाह म्हणाले, कुबड्या नको, नाराज शिंदें गटाला विनाशाची कुणकुण लागायला हवी होती, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, 'त्या' 3 घटना जिव्हारी



Shivsena Shinde Camp & BJP: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सध्या राज्यभरात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मेगाभरती सुरु केली आहे. त्यामध्ये भाजपने (BJP) कोणताही भेदभाव न बाळगता ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गळाला लावायला सुरुवात केली आहे. यामुळे शिंदे गट प्रचंड नाराज झाला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Camp) मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच (Cabinet Meeting) बहिष्कार टाकला. त्यामुळे महायुतीमध्ये वरवर सर्व आलबेल दिसत असले तरी आतमध्ये प्रचंड खदखद असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाच्या या नाराजीसाठी अनेक घटना कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा बैठक होती. मात्र, या बैठकीला एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेचा एकही मंत्री हजर नव्हता. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना याचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, ‘ एकनाथ शिंदे यांनी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आकडेवारी आणि डेटा गोळा करायला सांगितला आहे’, असे सांगितले. मात्र, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून शिंदे गटाला इतकी कोणती महत्त्वाची स्ट्रॅटेजी आखायची होती, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घटनेमुळे पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरु असून शिंदे गटाच्या नाराजीमागे मोठं कारण असल्याची चर्चा आहे.  कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर शिंदे गटाचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. याठिकाणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपकडून सुरु असलेल्या फोडाफोडीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

Eknath Shinde Shivsena: भाजपच्या ‘त्या’ दोन चाली, कुबड्या फेकण्याची भाषा, शिंदे गट इतका का धास्तावला?

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये प्रचंड अंतर्गत तणाव असल्याची जोरदार चर्चा आहे. धाराशिव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या खात्याला डावलून भाजपच्या राणाजगजितसिंह यांना परस्पर निधी देण्यात आला. याशिवाय, एकनाथ शिंदे यांचे अनेक निर्णय परस्पर रद्द करण्यात आले. यामुळे शिंदे गटात प्रचंड धुसफुस होती. आजपर्यंत शिंदे गटाचे मंत्री एकाही कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिलेले नाहीत. पहिल्यांदाच शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिल्याने नाराजीचे कारण काहीतरी मोठे असावे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. हा श्रीकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष शह असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेला संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांना भाजपने प्रवेश दिला. याचा अर्थ भाजप आगामी काळात शिवसेनेला शह देण्याची तयारी करत आहे का, असा प्रश्न शिंदे गटाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी, ‘महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नाही’, असे वक्तव्य केले होते. त्याचदृष्टीने आता ‘शत प्रतिशत भाजप’ या धोरणानुसार पावले टाकली जात असल्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा

महायुतीच्या गोटात प्रचंड खदखद? कॅबिनेट बैठकीला शिंदे गटाच्या मंत्र्यांची अचानक दांडी, देवेंद्र फडणवीसांच्या दालनात काय घडलं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *