
Mumbai Weather News मुंबई: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत (Maharashtra Weather) असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली घसरला आहे. राज्यातल्या काही ठिकाणी थंडीची लाटही आली आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी दिवसभर टिकून राहत असून संध्याकाळी थंडीचा कडाका वाढत आहे. यवतमाळ, परभणी, रत्नागिरीत तापमान दहा अंश सेल्सिअसच्याही खाली गेला आहे. पुणे आणि मुंबई देखील गारठली आहे. विशेष म्हणजे एरव्ही घामांच्या धारांनी बेजार होणाऱ्या मुंबईकरांनी आज सर्वात थंड सकाळ (Mumbai Cold) अनुभवली आहे. आजची (19 नोव्हेंबर) सकाळ मुंबईतली 11 वर्षातली सर्वात थंड सकाळ (Mumbai Cold Wave) ठरली आहे. आज सकाळी मुंबईतील किमान तापमान 16.2 एवढं होतं.
गेल्या 11 वर्षांमधील मुंबईतील किमान तापमान- (Mumbai Weather News)
2025- 16.2
2024 – 16.5
2023 – 19.7
2022 – 17.0
2021 – 19.8
2020 – 19.2
2019 – 20.5
2018 – 19.2
2017 – 18.0
2016 – 16.3
2015 – 18.2
19 Nov, I am sure u all must hv felt a very cool morning in Mumbai & around.
Yes it’s one of the coldest. Take care. It’s lowest in last 11 years…
Indicated yesterday that there could be spl morning surprise
CLB 21.6 °C
SCZ 16.2 °C ⏬
IMD Mumbai data@ClimateImd https://t.co/1S7akyslN1 pic.twitter.com/CmVvPMqhJ0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 19, 2025
पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी निचांकी तापमानाची नोंद- (Pune Weather News)
पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर होतं. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं. मात्र काल पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घटण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. लोणी काळभोर येथे 6.9 सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
परभणीचे तापमान 7 अंशावर- (Parbhani Weather)
परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये मागच्या आठवडाभरापासून थंडीची लाट कायम आहे आज जिल्ह्याचे तापमान हे 7 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे जे यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमान आहे मागच्या आठवडाभरापासून जर बघितलं तर परभणी जिल्ह्याचे तापमान हे सातत्याने दहा अंशाखालीच आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर थंडीचा कडाका जाणवतोय दिवसभर हवेतील गारवा कायम राहत असल्यामुळे परभणी करांना अक्षरशः हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय.
यवतमाळ जिल्ह्यातील थंडीचा जोर वाढला- (Yavatmal Weather)
यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून पारा 9.6 अंशवर आला आहे. दिवसाच्या किमान तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला शितलहरीचा अलर्ट दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात जर पाहिलं तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. परिणामी सर्वत्र थंडीची हुडहुडी जाणवत आहे. नागरिक उबदार कपड्यांचा वापर करीत असून रात्री 8 वाजतापासून रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये नागरिक शेकोटीचा आधार घेत आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये (सकाळी ८ः३०)-
सांताक्रुज – १६.२
सांगली – १४.१
सोलापूर – १५.३
डहाणू – १६.६
संभाजीनगर – १०.५
नंदुरबार – १३.१
पुणे – ९.५
कुलाबा – २१.६
सातारा – ११
कोल्हापूर – १६.२
उदगीर – १२.२
महाबळेश्वर- १२.५
नाशिक – ९.७
परभणी – ११.२
मालेगाव – ९.४
माथेरान – १६.८
बारामती – ९.५
धाराशिव – १३
नवी मुंबई – १९
नांदेड – १०.२
जेऊर – ८.३
अहिल्यानगर – ८.५
आणखी वाचा