Headlines

Saif Ali Khan Buy Property In Mumbai: सैफ अली खानचा नवाबी थाट, मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी प्रॉपर्टी; अभिनेत्याचं नेटवर्थ किती?

Saif Ali Khan Buy Property In Mumbai: सैफ अली खानचा नवाबी थाट, मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी प्रॉपर्टी; अभिनेत्याचं नेटवर्थ किती?
Saif Ali Khan Buy Property In Mumbai: सैफ अली खानचा नवाबी थाट, मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी प्रॉपर्टी; अभिनेत्याचं नेटवर्थ किती?



Saif Ali Khan Buy Properties In Mumbai: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता सैफ अली खाननं (Saif Ali Khan) त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी (Real Estate Property) जोडली आहे. त्यानं अलिकडेच मुंबईतील (Mumbai News) अंधेरी (Andheri) पूर्व इथे एकूण 30.75 कोटींची दोन कमर्शियल प्रॉपर्टी (Commercial Property) खरेदी केली आहेत. सैफ अली खाननं (Actor Saif Ali Khan) ज्या ठिकाणी ही मालमत्ता विकत घेतली आहे, ते ठिकाण मुंबईतील सर्वात श्रीमंत ठिकाणांपैकी एक आहे.

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कनकिया वॉलस्ट्रीट बिल्डिंगमध्ये असलेल्या दोन्ही युनिट्सचं एकूण क्षेत्रफळ 5,681 चौरस फूट आहे. या कमर्शियल फ्लॅट्ससह सहा कारसाठी पार्किंग देखील देण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या कमर्शियल प्रॉपर्टीची विक्रेते कंपनी यूएस-स्थित औषध कंपनी एपिओर फार्मास्युटिकल्स आहे. 

कतारमध्ये खरेदी केलंय नवं घर 

या वर्षी एप्रिलमध्ये, सैफनं कतारमधील सेंट रेजिस मार्सा अरेबिया बेटावरील द पर्ल येथील द रेसिडेन्स इथे एक आलिशान घर खरेदी केलं होतं. त्याला हे घर अगदी सहज पोहोचण्यासाठी आणि शानदार व्यूमुळे आवडलेलं. 

सैफ अली खानची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानची एकूण संपत्ती 1200 कोटी आहे. मुंबईतील वांद्रे इथे त्याच्याकडे दोन आलिशान घरं आहेत, ज्यांची प्रत्येकी किंमत 100 कोटी आहे. त्याच्याकडे पतौडी पॅलेस देखील आहे, ज्याची किंमत 800 कोटी आहे. तसेच, तो एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपयांचं मानधन घेतो. 


सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सैफ अली खानला सर्वात शेवटी ‘ज्वेल थीफ’ सिनेमात पाहिलं गेलं होतं. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेला. यामध्ये जयदीप अहलावत, निकिता दत्त आणि कुणाल कपूर होते. आता सैफ अली खान ‘डाइनिंग विद द कपूर्स’ आणि ‘हैवान’मध्ये दिसणार आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘टशन’ सिनेमानंतर सैफ अली खान अक्षय कुमारसोबत पुन्हा काम करणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Building On Name Of Shah Rukh Khan: किंग खानच्या फॅन फॉलोइंगचा नाद खुळा, शाहरुख खानच्या नावानं बांधतायत 4000 कोटींची बिल्डिंग; एका फ्लॅटची किंमत किती?

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *