Headlines

Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंकडून तक्रारींचा पाढा; अमित शाहांनी एक वाक्य बोलत विषय संपवून टाकला, नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंकडून तक्रारींचा पाढा; अमित शाहांनी एक वाक्य बोलत विषय संपवून टाकला, नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंकडून तक्रारींचा पाढा; अमित शाहांनी एक वाक्य बोलत विषय संपवून टाकला, नेमकं काय म्हणाले?



Eknath Shinde Meets Amit Shah: शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (19 नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर येत आहे. 

अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत एकनाथ शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची (Ravindra Chavan) तक्रार केल्याचं कळतंय. कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. तसंच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक फोडले. भाजपच्या याच कृत्यावरुन एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंकडून तक्रारी; अमित शाह काय म्हणाले? (Amit Shah On Eknath Shinde)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची भेट घेत तासभर चर्चा केली. या भेटीची एक्स्लुझिव्ह माहिती आता समोर आली आहे. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे. या संपूर्ण घडामोडींकडे माझं लक्ष आहे असं अमित शाह भेटीत म्हणाले अशी माहिती एबीपी माझाला समजलीय. एकनाथ शिंदेंची तक्रार अमित शाहांनी संपूर्ण ऐकून घेतली आणि आपलं या घडामोडींकडे लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं.

मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा- एकनाथ शिंदेंचे आदेश (Eknath Shinde Meets Amit Shah)

मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्ष प्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेने मित्र पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, असं सूत्रांनी म्हटलं. तसंच महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावल्याची माहिती समोर येत आहे.

अमित शाह एकनाथ शिंदेंना काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे फडणवीस अन् चव्हाणांची तक्रार; उद्धव ठाकरेंचंही घेतलं नाव, दिल्लीत काय घडलं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *