
Eknath Shinde: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून बालेकिल्ल्यात सुरु असलेल्या फोडाफोडी विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेत तक्रारीचा पाढाच वाचला. यावेळी अमित शाह यांनी माझे या सर्व घडामोडींवर लक्ष असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, अशी चर्चा आहे. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अभय दिल्याची सुद्धा चर्चा रंगली. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात मात्र सर्व काही आलबेलनसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आलं आहे. काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे प्रवास केल्याची चर्चा असतानाच आज (21 नोव्हेंबर) सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झाला नसल्याने राजकीय चर्चेला आणखी जोर आला आहे.
VIDEO | Maharashtra CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) pays floral tribute on Hutatma Smriti Day at Martyrs’ Memorial, Mumbai.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)#Maharashtra #Mumbai #HutatmaSmritiDay pic.twitter.com/7qWvt0ZojR
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2025
मुंबईतही नाराजी दिसून आली
हुतात्मा चौकातील कार्यक्रमात अभिवादन करताना एकनाथ शिंदे यांची देहबोली स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र गेले होते. सोहळ्यामध्ये सुद्धा एकत्र दिसून आले. मात्र, शिंदे यांचा स्वतंत्र प्रवास आणि अलिप्तपणा प्रकर्षाने दिसून आला. एकनाथ शिंदे यांनी बिहारसाठी स्वतंत्रपणे प्रवास केला. सोहळ्यामध्येही ते एकत्र दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी किमान मुंबईमध्ये परतल्यानंतर तरी कमी होईल असं म्हटलं जात असतानाच मुंबईतही नाराजी दिसून आली. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. मात्र, त्यामध्ये नेहमीची देहबोली अन् उत्साह अजिबात दिसून आला नाही. तसेच तितका संवाद सुद्धा झाला नाही. त्यामुळे दोघांचे चेहरे बरंच काही बोलून जात होते.
माजी नगरसेवकांची पैसा देऊन फोडाफोडी
भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण केलं जात आहे. यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला सुरूंग सर्वाधिक लावला जात आहे. याला एकनाथ शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दौरा करत अमित शाह यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. माजी नगरसेवकाना पैसा देऊन फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा