
Mhada Mumbai home Lottery: जमिनीला सोन्याचा भाव असणाऱ्या मुंबईत आपले स्वत:चे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. अशा नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून (Mhada) स्वस्त दरात घरे उपलब्ध करुन दिली जातात. म्हाडा बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किंमतीने सामान्य नागरिकांना मुंबईतील मोक्याच्या जागी घरे उपलब्ध करुन देते. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीकडे (Mhada Lottery) सर्वसामान्यांच्या कायम नजरा लागलेल्या असतात. आगामी काळात म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर अशी ओळख असणाऱ्या वरळी परिसरात घरं दिली जाणार आहेत. म्हाडाने वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात 58 मजली आणि 85 मजली असे दोन टॉवर्स उभारण्याची योजना आखली आहे. या इमारती पूर्ण झाल्यावर सामान्य मुंबईकरांना लॉटरी प्रक्रियेद्वारे या अलिशान आणि पंचतारांकित सुविधा असलेल्या इमारतींमध्ये राहण्याची संधी मिळू शकते. (Mhada homes in Mumbai)
प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील बीडीची चाळीतील रहिवांशाच्या पुनर्वसनासाठी सध्या म्हाडाकडून इमारती बांधल्या जात आहेत. या पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाला स्वत: विकसित करण्यासाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध होणार आहे. याच जागेवर म्हाडाकडून 58 मजली आणि 85 मजली असे दोन टॉवर्स उभारण्याची योजना आहे. याशिवाय, म्हाडाकडून स्वतंत्रपणे विक्री करण्यासाठी आणखी तीन टॉवर्स उभारले जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाला विमानतळ प्राधिकरणानेही परवानगी दिली आहे. हे दोन्ही इमारती उभ्या राहिल्यानंतर म्हाडाकडून नेहमीप्रमाणे लॉटरी पद्धतीने या घरांचे वाटप केले जाईल. या इमारतींमध्ये अनेक अलिशान सुविधा उपलब्ध असतील.
CIDCO affordable homes: नवी मुंबईत सिडकोच्या 4,508 घरांची विक्री
सिडकोने (CIDCO) प्रथमच नवी मुंबईत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ’ तत्त्वावर 4,508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Mumbai Dharavi Survey: धारावीत 18 हजार घरांचे सर्वेक्षण
मुंबईतील धारावी परिसरात नुकतेच 18 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या मोहीमेवेळी घरांच्या कागदपत्रांची पडताळणी, घरांना क्रमांक देण्याची प्रक्रिया, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण या प्रक्रियेमुळे प्रलंबित प्रकरणांची नोंदणी वेगाने पूर्ण होत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा