
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल.अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असणार आहे. सोबतच मध्य रेल्वेवर आजपासून (22 नोव्हेंबर) ते पुढच्या 3 डिसेंबरपर्यत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर 2 ते 3.30 पर्यंत ब्लॉक राहणार आहे.
Local Train Block: ब्लॉकमागील नेमकं कारण काय?
बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. यावेळी 350 मेट्रिक टन क्षमतेची क्रेन पादचारी पुलासाठी 37.2 मीटर लांबीचे 18 स्टील गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी 350 मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन वापरण्यात येणार आहे. गर्डर उभारणीसाठी शनिवार, 22 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Train : शेवटची कर्जत लोकल 11.30 वाजता
दरम्यान या ब्लॉक कालावधीत 12.12ची कर्जत-सीएसएमटी अंबरनाथपर्यंत धावेल. सोबतच कर्जतहून 2.30 वाजेला सुटणारी लोकल अंबरनाथ येथून 3.10 वाजता सीएसएमटीसाठी रखाना होईल. दोन्ही दिशेला ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहील. यामुळे सीएसएमटीतून कर्जतपर्यंत 11.30 वाजाताची कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल असणार आहे.
Mumbai Local Train Megablock : कधीपर्यंत असेल विशेष रात्रकालीन ब्लॉक
पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स येथे बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे हटविण्यासाठी मध्य रेल्वेने 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे कळवलं आहे. हे ब्लॉक रात्री 1.30 ते 3.30 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पनवेल आणि कळंबोलीदरम्यान 3 प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी अप आणि डाऊन मार्गिका तसेच इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिकांवरील वापर पूर्णपणे बंद असेल. यासह 20 मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील, अशी देखील माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे घरातून निघतांना अथवा लोकल प्रवास करताना रेल्वेचे नियोजन बघून निघावं, असे आवाहन करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा