
Amit Satam: लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदीत बोलल्यानंतर तुला मराठी बोलता येत नाही का? यावरून झालेल्या वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरेनं आत्महत्या केली. या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे विचारत मारहाण झाली होती. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. मारहाणीनंतर अर्णव मानसिक तणावात होता. याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आता भाजपकडून ठाकरे बंधूंविरोधात सद्बुद्धि द्या म्हणत आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.
‘सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन’
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंविरोधात भाजपकडून ‘सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन’ करण्यात आले. हे आंदोलन तोंडाला काळ्या फिती बांधून करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या बाजूला जमून आंदोनल करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम, आमदार अतुल भातकळकर,आणि मुंबईतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले. “भाषा ही संपर्काचे माध्यम आहे संघर्षाचे नाही” असे फलक यावेळी हातामध्ये होते.
संपलेला राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद
अमित साटम म्हणाले की, भाषा भाषांमध्ये वाद काही पक्ष करत आहेत. यामध्ये मराठी तरुणाला जीव गमवावा लागला. संपलेलं राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत. काही पक्ष काही नेते हे राजकारण करत आहेत. त्यांना सुबुद्धी देवो यासाठी आम्ही येथे एकत्र आलो आहोत. माणसाने माणसाला माणसासम वागू द्या. बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावरुन या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना सुबुद्धी द्यावी, असे सांगितल्याचे ते म्हणाले. माणसाने माणसाला माणसासम वागू द्या, असे साटम म्हणाले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवच्या वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की मराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा