
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरुन काँग्रेसमध्ये(Mumbai Congress) मतमतांतरे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत (MNS) जाण्यास नकार दिल्याचं दिसतंय. तर विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडे कल आहे. राष्ट्रवादीचे शरद पवारही मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक दिसतात. अशा वेळी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्याचं दिसतंय.
शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला सोबत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक असल्याचंही ते म्हणाले.
शिवसेना आणि मनसे एकत्रच असून त्यासाठी आम्हाला कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं थेट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शरद पवार आणि डावे पक्षसोबत मुंबई वाचवण्यासाठी आमच्यासोबत आहेत असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Tweet : नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही: मुंबई काँग्रेस
हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा!
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा! pic.twitter.com/kwDg49jJjy
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2025
MNS Shiv Sena Alliance : ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार
काँग्रेसचा निर्णय काहीही असो, मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी इतर लहान पक्षांचाही पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे, मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचं शरद पवारांनीही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर आता मुंबई काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.
Vijay Wadettiwar On MNS : वडेट्टीवार सकारात्मक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत आघाडी केल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितले. त्यामुळे मनसेसोबत जाण्याचे संकेत वडेट्टीवारांनी दिले आहेत. शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावे, विचार जुळत नसले तरी भाजपविरोधात सगळ्यांनी एकत्र यावं असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा