Headlines

VIDEO : शिंदे आले, नमस्कार केला पण फडणवीसांपासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; अबोला कायम

VIDEO : शिंदे आले, नमस्कार केला पण फडणवीसांपासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; अबोला कायम
VIDEO : शिंदे आले, नमस्कार केला पण फडणवीसांपासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; अबोला कायम



मुंबई : महायुतीतील फोडाफोडीच्या नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये अबोला कायम असल्याचं चित्र आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या दिव्यज फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसल्याचं दिसून आलं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या दोन मोकळ्या खुर्च्या या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या. 

राज्यातील नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र आले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दिव्यज फाऊंडेशनने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असतानाही या दोन्ही नेत्यांनी संवाद टाळल्याचं दिसून आलं.

Maharashtra Politics : नेमकं काय घडलं?

मुंबईतील या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आधीच येऊन बसले होते. त्यानंतर समोरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभारले आणि त्यांनी शिंदेंना नमस्कार केला. तसेच त्यांना हात करुन बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं.

एकनाथ शिंदेंनीही फडणवीस आणि उपस्थितांना नमस्कार केला. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या दोन खुर्च्या सोडल्या आणि बाजूला बसले. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन खुर्च्यांचं अंतर होतं. 

Eknath Shinde Vs BJP : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम

ठाणे, डोंबिवली, पालघर, नवी मुंबईमध्ये भाजपने शिवसेनेचे नेते फोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. या वादानंतर एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले, त्यांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं, पण त्यांची नाराजी काही दूर झाली नसल्याचं चित्र आहे. पाटण्यात नितीशकुमारांच्या शपथविधीला हजेरी लावली तिथेही त्यांच्या देहबोलीतून हे दिसून आलं.

नीतिशकुमारांच्या शपथविधीवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नेते वेगवेगळ्या मार्गानं पाटण्यात पोचले. पण तिथं भेटल्यावरही दोघांमध्ये कोरडेपणाच राहिला. फडणवीसांनी स्मितहास्य करत नमस्कार केला, पण शिंदेंनी प्रत्युत्तरादाखल नुसती हात जोडून औपचारिकता दाखवली, ओठ हलवलेच नाहीत.

मुंबईतील हुतात्मा स्मारक कार्यक्रमावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, मात्र दोघांमध्ये तितकासा संवाद झालेला दिसला नाही. भाजपच्या फोडा फोडीच्या राजकारणावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *