Headlines

Mumbai News : ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात, दोन महिन्यांपासून महिलेला डिलिव्हरी बॉयचे अश्लील मेसेज

Mumbai News : ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात, दोन महिन्यांपासून महिलेला डिलिव्हरी बॉयचे अश्लील मेसेज
Mumbai News : ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात, दोन महिन्यांपासून महिलेला डिलिव्हरी बॉयचे अश्लील मेसेज



मुंबई: ऑनलाइन अॅपवरुन किराणा सामान (Grocery Order) ऑर्डर करणे एका महिलेला चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं. दोन महिन्यांपासून एक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) तिला सतत अश्लील मेसेज पाठवत होता, धमक्या देत होता आणि व्हॉट्सअॅपवरून त्रास देत होता. अखेर त्रस्त होऊन महिलेने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून तो सध्या फरार आहे.

Delivery Boy Harassment : किराणा मागवल्यापासून सुरू झाला त्रास

परिनाज नावाच्या महिलेने 23 सप्टेंबर रोजी एका ऑनलाइन अॅपवरून घरचे किराणा सामान मागवले होते. दुपारी 4 च्या सुमारास डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पोहोचला. काही वस्तू उपलब्ध नसल्याचे सांगून रिफंड करण्यासाठी नंबर हवा असे सांगत त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला.

पुढच्या दिवशी त्याने कॉल करून रिफंडची माहिती दिली. परिनाजने त्याला सामान्य व्यवहार समजून धन्यवाद दिले. पण याच क्षणापासून तिच्या छळाची मालिका सुरू झाली. डिलिव्हरी बॉयने तिचा नंबर सेव करून व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

Mumbai Harassment Case : इशाऱ्यानंतरही थांबला नाही छेडछाड

परिनाजने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितले. पतीने आरोपीला कडक शब्दात इशारा दिला आणि अशा मेसेजपासून दूर राहण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला, पण 28 सप्टेंबरला पुन्हा अश्लील मेसेज पाठवले.

महिलेने संतापून पुन्हा इशारा दिला की पुढच्यावेळी ती पोलिसात तक्रार करेल. त्यावर आरोपीने नंबर ब्लॉक केला, गावी जात आहे असे सांगून वेळ मारून नेली. पण त्याची ही कृती काही थांबली नाही.

Delivery Boy Misbehaviour : नवीन नंबरवरून धमक्यांचे मेसेज

19 नोव्हेंबरला आरोपीने नवीन नंबरवरून पुन्हा मेसेज पाठवायला सुरुवात केली. परिनाजला एकटीला भेटण्याचा प्रस्ताव दिला. तिने नकार दिल्यावर त्याने धमक्या देणे सुरू केले. सततची छेडछाड, व्हॉट्सअॅप मेसेज, स्टॉकिंग आणि भीतीदायक धमक्यांमुळे परिनाज पूर्णपणे घाबरली. अखेर तिने भायखळा पोलिस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *