
ठाणे: ठाणे शहरातील (Thane) पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेनं (MNS) पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. स्वत: मनसे नेते अविनाश जाधव यांनीच याबाबत माहिती दिली होती. पण, अवघ्या २४ तासांमध्ये हा परप्रांतीय रिक्षाचालक भानावर आला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राज ठाकरेंची माफी मागितली. एवढंच नाहीतर त्याने कान धरून उठबश्याही काढल्या आहेत.
Thane Video: पोलीस स्टेशन गाठत माफी मागितली आणि उठाबशा काढल्या
ठाण्यातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली होती. शैलेंद्र संतोष यादव असं या परप्रांतीय रिक्षा चालकाचं नाव आहे. किरकोळ कारणावरून रिक्षाचालक शैलेंद्र यादव आणि एका मराठी तरुणामध्ये बाचाबाची झाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालक भानावर आला आणि थेट पोलीस स्टेशन गाठत माफी मागितली आणि उठाबशा काढल्या. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सर्व घटनेनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
राज ठाकरेंना अभद्रपणे बोलणारा तो परप्रांतीय रिक्षाचालक अवघ्या २४ तासांमध्ये भानावर आला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राज ठाकरेंची माफी मागितली. एवढंच नाहीतर त्याने कान धरून उठबश्याही काढल्या आहेत.#RajThackeray #video #MNS #thane pic.twitter.com/5SHWXSAoAK
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 25, 2025
Thane Video: त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो
त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, ‘मी शैलेंद्र संतोष यादव, हात जोडून विनंती करतो आणि मी सॉरी म्हणतो. काल गांधी नगर येथील मनसेच्या शाखेसमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी एक अनोळखी माणूस आला, त्या माणसासोबत माझा वाद झाला. वादातून भांडणं झालं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल बोलताना माझ्या तोंडातून अपशब्द आले आणि शिव्या निघाल्या. त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो. या पुढे असं काही होणार नाही. मी एक रिक्षावाला आहे, रिक्षा चालवून घर कसंबसं चालवतो. मी या पुढे अशी कोणतीही चूक करणार नाही. मी दारूच्या नशेत होतो, त्यामुळे मी असं बोललो. त्यामुळे हात जोडून माफी मागतो, असं म्हणत या रिक्षाचालकाने कान धरून उठबश्या मारल्या.
Thane Video: नेमकं काय घडलं होतं?
“कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव सब मेरे लं… “ ”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” अशा शब्दात परप्रांतिय रिक्षाचालकाने मनसे नेत्यांबद्दल अश्लिल भाषेचा वापर करत शिवीगाळ केली होती. ठाण्यातील गांधी नगरमध्ये परप्रातींय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला होता. प्राथमिक माहितीनुसार, रिक्षा लावण्यावरुन हा झाला वाद झाला होता. या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर परीसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अभ्रद्र शिविगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करु अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आल्याने मनसेही आक्रमक झाली होती.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते, मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे. जो कोणी राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती.
हे ही वाचा – कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
आणखी वाचा