Headlines

VIDEO : माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या

VIDEO : माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या
VIDEO : माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या



बीड : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पीए अनंत गर्जेवर गौरी पालवे (Gauri Palve) यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीची हत्या झाली, त्यानंतर ती आत्महत्या दाखवण्यात आल्याचा आरोप गौरी पालवेच्या वडिलांनी केली. या प्रकरणात जे काही करायचं ते करा, पण आम्हाला न्याय द्या अशी मागणी गौरीच्या कुटुंबीयांनी केली.

पंकजा मुंडे यांचा खासगी पीए असलेल्या अनंत गर्जे याच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे हिचा 23 नोव्हेंबर रोजी मुंबईतील राहत्या घरात मृतदेह आढळला. गौरीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. तर गौरीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

Gauri Palve Suicide Case : गौरीची हत्याच, वडिलांचा दावा

गौरी पालवेचे वडील म्हणाले की, या प्रकरणात गुन्हेगारांची नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग जे काही करायचं ते करा. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी न करता आत्महत्या कसे ठरवता? अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि त्याची बहीण यांची चौकशी व्हावी. अनंत गर्जे त्याचे स्टेटमेंट वारंवार बदलत आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करा आणि त्यांचा सीडीआर आम्हाला द्या अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली. दोन सहकाऱ्यांच्या मदतीने गौरीला मारण्यात आले आहे. गौरीच्या डोक्यावर आणि छातीवर मारल्याच्या खुना आहेत. मग स्पॉट पंचनामा करून ही आत्महत्या कशी काय ठरवली? असा प्रश्न तिच्या वडिलांनी केला.

गौरीला मारहाण करण्यात आली, त्यामध्ये तिचा जीव गेला. त्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आल्याचा दावा गौरीच्या वडिलांनी केला. अनंतने आदल्या दिवशी फोन करून गौरीने आत्महत्या केल्याचं सांगितलं, तिचे प्रेत समोर असल्याचं सांगितलं. त्यामुळे अनंत गर्जे हा वारंवार त्याचे स्टेटमेंट बदलतोय असा दावा गौरीच्या वडिलांनी केला.

Gauri Palve Case : बिल्डिंगचा सीसीटीव्ही मिळावा

गौरीच्या हत्येच्या आरोपात नणंद आणि दिराला अटक करण्याची मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे, गौरी पालवेच्या वडीलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहलं आहे. गौरीच्या हत्याप्रकरणात फक्त अनंत गर्जेला अटक झाली, या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि नणंद शितल आंधळे मोकाट फिरत आहेत, असा उल्लेख पत्रात करण्यात आला. तर अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डींगचा CCTV देण्याचीही मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे.

Anant Garje Arrested : अनंत गर्जेला अटक

डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी घटनेच्या दिवशी रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घरगुती वादातून डॉ. गौरी पालवेने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसल्याचं सांगत, वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अनंत गर्जेसह बहिण शीतल गर्जे आंधळे, दीर अजय गर्जेविरोधात, आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याचवर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झालं होतं. मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, आणि मारहाण केली जायची असे आरोप पालवे कुटुंबीयांनी केले. या वादातूनच गौरी पालवेने टोकाचं पाऊल उचलल्याचे म्हटलं जातं आहे.

बी बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *