Headlines

धक्कादायक! कांदिववलीत बनावट RTO अधिकाऱ्याने केली फसवणूक, 5 हजार 200 रुपये उकळले, आरोपींना अटक 

धक्कादायक! कांदिववलीत बनावट RTO अधिकाऱ्याने केली फसवणूक, 5 हजार 200 रुपये उकळले, आरोपींना अटक 
धक्कादायक! कांदिववलीत बनावट RTO अधिकाऱ्याने केली फसवणूक, 5 हजार 200 रुपये उकळले, आरोपींना अटक 



Mumbai Kandivli Crime News :  कांदिवली पूर्व समतानगर येथे बनावट आर.टी.ओ. अधिकारी बनून युवकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 18 नोव्हेंबर रोजी फिर्यादीकडून गाडी चेक करावी लागेल असे सांगून 5 हजार 200 रुपये उकळले. याप्रकरणी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सचिन चव्हाण (38) आणि अजित भगत सिंग (38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  

विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल 

दरम्यान, विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 170, 171, 34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या दोन्ही आरोपी समता नगर पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींनी अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली यासंदर्भात तपास सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon Crime : एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *