Headlines

Bogus Voter : निवडणूक यादीतील सर्वात मोठा घोळ, मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा धर्म बदलला

Bogus Voter : निवडणूक यादीतील सर्वात मोठा घोळ, मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा धर्म बदलला
Bogus Voter : निवडणूक यादीतील सर्वात मोठा घोळ, मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा धर्म बदलला



मुंबई : राज्यातील निवडणूक याद्यांमध्ये घोटाळ्याची (Voters List Scam) मालिका सुरूच असून आताही एक मोठा घोटाळा मनसेने उघड केला आहे. मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी (Manish Dhuri MNS) यांचे नावानेच घोटाळा करण्यात आला आहे. मनीष धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे, तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर एका मुस्लिम महिलेचं नाव असल्याचं उघडकीस आलं. यावर निवडणूक आयोगाने जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला.

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार एकदा पुन्हा समोर आहे. एकीकडे मुंबईत दुबार मतदारांची संख्या 11 लाख असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचवेळी मतदार यादीमध्ये आपल्या नावाने बोगस मतदार तयार केल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला.

Mumbai Bogus Voter News :फोटोसमोर बंगाली नाव

अंधेरी पश्चिम मतदारसंघात वार्ड क्रमांक 69 मध्ये यादी क्रमांक 272 मध्ये हा घोळ झाल्याचं समोर आल आहे. मनसेचे नेते मनीष धुरी यांच्या फोटोसमोर दास भुटो सुकुमार असं बंगालीमध्ये नाव असल्याचं उघड झालं. त्याचवेळी त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर शेख निशा यतिम असं नाव असल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे मनसेचे नेते मनीष धुरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

MNS On Voters List Scam : मनसे स्टाईलने आंदोनल करणार

या प्रकरणी मनसेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांनीही मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा घोळ कसा करण्यात आला हे आताच्या प्रकरणावरुन समोर येतंय. निवडणूक आयोगाने जर यावर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला आहे.

मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी 2009 आणि 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे आमदार आहेत.

Mumbai Election Commission Scam : मुंबईत 11 लाख दुबार मतदार

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेने तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. निवडणूक आयोगाने थेट दुबार नावाबाबत, मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेकडूनही बोगस मतदार यादीचा आरोप करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *