Headlines

Maharashtra Election : नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली, 'इतक्या' वाजेपर्यंतच मतदान करता येणार; निवडणूक यंत्रणा सज्ज

Maharashtra Election : नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली, 'इतक्या' वाजेपर्यंतच मतदान करता येणार; निवडणूक यंत्रणा सज्ज
Maharashtra Election : नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली, 'इतक्या' वाजेपर्यंतच मतदान करता येणार; निवडणूक यंत्रणा सज्ज



मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी (Maharashtra Election) निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे.

Maharashtra Nagarpalika Election : दुबार नावांसमोर डबल स्टार चिन्ह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणं आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतल्याचं दिसून येतंय.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 66 हजार 775 इतके अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Maharashtra Election Commission : एकूण मतदार व मतदान केंद्र

  • पुरुष मतदार- 53,79,931
  • महिला मतदार- 53,22,870
  • इतर मतदार- 775
  • एकूण मतदार- 1,07,03,576
  • एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *