Headlines

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं गोची, कोणत्या जागांवरुन रस्सीखेच?; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीची Inside Story

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं गोची, कोणत्या जागांवरुन रस्सीखेच?; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीची Inside Story
Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं गोची, कोणत्या जागांवरुन रस्सीखेच?; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीची Inside Story



Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting Inside Story मुंबई: माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवर (Mumbai Municipal Corporation Election 2025) दोघांमध्ये थेट चर्चा झाली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 1.30 तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीत (Uddhav Thackeray Raj Thackeray Meet) नेमकं काय घडलं?, कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

ठाकरे बंधूंच्या चर्चेत नेमके काय घडले? (Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting Inside Story)

मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच सुरु आहे.  कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.

मुंबईत मनसेच किंगमेकर (Raj Thackeray And Uddhav Thackeray)

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस पक्ष मात्र मनसेला (MNS) नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाही. त्याचवेळी मतांची आकडेवारी पाहिल्यास, मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमणार नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 2024 च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेलासोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय. मुंबई महापालिकेच्या (BMC Election) 227 पैकी 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला थेट फायदा होईल असं चित्र आहे. दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडुप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्ती नगर, चांदीवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातील 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईत सध्या मनसेच किंगमेकर असल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीची Inside Story, VIDEO:

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray Meets Raj Thackeray: ठाकरे बंधूंमध्ये थेट चर्चा; उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल, ‘शिवतीर्थ’वर काय घडतंय?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *