Headlines

Mumbai Crime News: मुंबईत कॉलेजच्या तरुणीसोबत लॉजवर घडलं भयानक; जाग आली तेव्हा बाजुला दिसले 2 पुरुष, स्ट्रगलिंग मॉडेलनेच दिला धोका, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: मुंबईत कॉलेजच्या तरुणीसोबत लॉजवर घडलं भयानक; जाग आली तेव्हा बाजुला दिसले 2 पुरुष, स्ट्रगलिंग मॉडेलनेच दिला धोका, नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: मुंबईत कॉलेजच्या तरुणीसोबत लॉजवर घडलं भयानक; जाग आली तेव्हा बाजुला दिसले 2 पुरुष, स्ट्रगलिंग मॉडेलनेच दिला धोका, नेमकं काय घडलं?



मुंबई: मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Mumbai Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुषमा राव (वय वर्षे ३१) नावाच्या एका स्ट्रगलिंग मॉडेलला (Mumbai Crime News) अटक केली आहे, तर तिच्यासोबतच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत. कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीला (Mumbai Crime News) बेशुद्ध करण्यात आलं, त्यानंतर तिच्यावर दोघांनी एकापाठोपाठ एक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचं पिडीतेने पोलिसांना सांगितलं आहे.(Mumbai Crime News) 

Mumbai Crime News:  मार्केटिंग विक्रीसाठी पार्ट टाईम जॉब

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुंबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. ती आरोपी सुषमा रावच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग विक्रीसाठी पार्ट टाईम जॉब करत होती. सुषमाने पीडितेला सांगितले होते की, तिचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत चालू आहे. या ठिकाणी केवळ सुषमा आणि पीडिता या दोघीच काम करत होत्या.

Mumbai Crime News: जाग आली, तेव्हा तिला तिच्या शेजारी ते दोन पुरुष 

काही दिवसांपूर्वी याच कार्यालयाच्या ठिकाणी सुषमाने पीडित तरूणीला कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचं औषध दिलं. ते पिल्यानंतर विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्यानंतर सुषमाने तिच्या दोन साथीदारांना बोलावले. या दोन अनोळखी पुरुषांनी बेशुद्ध अवस्थेतील तरूणीवरती सामूहिक लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तरूणीने केला आहे. जेव्हा पीडितेला जेव्हा जाग आली, तेव्हा तिला तिच्या शेजारी ते दोन पुरुष असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी सुषमाने पीडितेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढलेले दाखवले. हे पाहून घाबरलेल्या पीडितेने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला आणि रात्री उशिरा अंधेरी पोलिसांकडे संबंधित घटनेबाबत तक्रार नोंदवली.

Mumbai Crime News: लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर

पीडितेच्या तक्रारीनंतर परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. त्यांनी सुषमा राव आणि तिच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध सामूहिक बलात्कार, गुंगीचं औषध देणे आणि विनयभंग आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी सुषमा रावला अटक केली आहे. अटकेनंतर तिची कसून चौकशी केली जात असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिच्या दोन फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेतला जात आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *