Hyundai Venue चा जलवा, जानेवारीत झाली सर्वाधिक विक्री, किंमत पाहा किती ?

Hyundai Venue चा जलवा, जानेवारीत झाली सर्वाधिक विक्री, किंमत पाहा किती ?
Hyundai Venue चा जलवा, जानेवारीत झाली सर्वाधिक विक्री, किंमत पाहा किती ?


हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने 2026 ची शानदार सुरुवात केली आहे. कारण कंपनीने जानेवारी महिन्यात आतापर्यंत सर्वात जास्त मासिक विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. एकूण 73,137 कारच्या विक्रीसह हुंडई इंडियाने भारतात 59,107 कार विकल्या आणि 14,030 कारची निर्यात केली आहे. घरगुती विक्रीत कंपनीने अलिकडेच लाँच झालेल्या नव्या हुंडई वेन्यू एसयुव्हीच्या 12,413 यूनिट्स विकल्या गेल्या. Hyundai Venue कार साल 2019 पासून बाजारात आहे. वेन्यू मॉडेलची ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.दुसरी सर्वात जास्त विक्रीवाली मॉडेल्समध्ये ऑरा सेडानचा समावेश आहे. ज्याची जानेवारीत 7,978 यूनिट्सची विक्री दिली आहे.

हुंडई व्हेन्यू किंमत

व्हेन्यूचे जेनरेशन मॉडल नोव्हेंबर 2025 मध्ये 7.99 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम)आकर्षक सुरुवातीची किंमतीवर लाँच केला होता. यावेळी व्हेन्यूला संपूर्णपणे नवा एक्सटीरियर डिझाईन दिले आहे.ज्यात समोरच्या बाजूला शानदार सी-शेप एलईडी डीआरएल आणि हेडलाईटचा कॉम्बोचा समावेश आहे. याचे इंटीरिअर आता फ्यूचरिस्टिक वाटते. आणि या सेगमेंटमध्ये स्टँडर्ड म्हणून 16 लेव्हल 2 एडीएएस सेफ्टी फंक्शन आणि 6 एअरबॅग दिल्या आहेत.

हुंडई व्हेन्यू डिझाईन आणि फिचर्स

डिझाईन आणि फिचर्सच्या बाबतीत व्हेन्यू प्रत्येक बाबतीत खरी उतरली आहे. परंतू याच्या यशाचे मुख्य कारण हुंडईद्वारा या कॉम्पॅक्ट एसयुव्हीला विविध मुल्य पर्याय, इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायाच्या कारणाने हीची व्यापक लोकप्रियता आहे. 9 ट्रीम लेव्हलमध्ये 20 हून अधिक व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. व्हेन्यूचे एक असे मॉडेल उपलब्ध आहे जे प्रत्येकाची गरज पूर्ण करते. 7.99 लाख रुपयांपासून ते 15.69 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) किंमतीची ही एसयूव्ही स्पोर्ट युटिलिटी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचे शानदार ऑप्शन आहे.

हुंडई व्हेन्यू इंजिन ऑप्शन

हुंडई व्हेन्यू कारमध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचा पर्याय देत. ज्यात 1.2 लिटरचे नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल,1.0 लिटरचे टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटरच्या डीझेल इंजिनाचा समावेश आहे. या सर्व इंजिन पर्यायासह ग्राहक त्यांच्या गरजेनुसार मॅन्युएल, ऑटोमेटिक वा डबल- क्लच (DCT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पैकी कोणा एकाची निवड करु शकतो. स्टाईल आणि फिचर्समुळे हुंडई व्हेन्यूची जानेवारी 2026 ची मासिक विक्री आतापर्यंतची सर्वाधिक राहिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *