T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video

T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू,  Video
T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू,  Video


T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडूImage Credit source: video grab/Instagram

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहेत. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सहभागी संघांचं आगमन सुरू झालं आहे. स्पर्धेपूर्वी वातावरणाशी जुळवून घेणं आणि सराव करण्यासाठी संघ ठरल्याप्रमाणे येत आहेत. भारत आणि श्रीलंकेत संघ आणि त्यांच्या खेळाडूंचं आगमन होतं आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून एक दोन दिवसात सर्व संघ येतील. पण अजूनही पाकिस्तानचं काही ठरलेलं नाही. जर्सी अनावरणाचा कार्यक्रमही पाकिस्तानने रद्द केला. त्यामुळे संशयाला वाव आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानचं स्पर्धेतील सहभागाविषयी स्पष्ट कळेल. असं असताना पाकिस्तान वंशाचे तीन खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आले आहेत. अमेरिकेची टीम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचली आहे. या संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. भारतीय परंपरेनुसार माथ्यावर तिलक लावून खेळाडूंचा आदरातिथ्य करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकन संघ दुसऱ्यांदा सहभागी होती आहे. मागच्या पर्वात अमेरिकेने सुपर 8 फेरीपर्यंत मजल मारत इतिहास रचला होता. या संघात मागच्या पर्वातील 10 खेळाडूंचा सहभाग आहे. तर संघाची धुरा मोनांक पटेलच्या हाती आहे. गेल्या काही वर्षांपासून तो संघाची धुरा सांभाळत आहे. अमेरिकेच्या संघात तीन खेळाडू हे पाकिस्तान वंशाचे आहेत. शायन जहांगीर, अली खान आणि मोहम्मद मोहसिन हे पाकिस्तान वंशाचे खेळाडू संघासोबत भारतात आले आहेत. या खेळाडूंचं माथ्यावर तिलक लावून स्वागत करण्यात आलं. अमेरिकेचा संघ गट अ मध्ये असून भारत, पाकिस्तान, नेदरलँड आणि नामिबिया हे संघ आहेत.

अमेरिकेचा पहिला सामना भारताशी होणार आहे. हा सामना 7 पेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. त्यानतर अमेरिका पाकिस्तान यांच्या 10 फेब्रुवारीला कोलंबोत लढत होईल. त्यानंतर अमेरिका नेदरलँड सामना चेन्नईत 13 फेब्रुवारीला, तर 15 फेब्रुवारीला अमेरिका नामिबिया सामना चेन्नईत होईल.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अमेरिकन संघ : मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंह, एंड्रीज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ति, हरमीत सिंह, नोस्टुश केनजिगे, शॅडली वान शल्कविक, सौरभ नेत्रवालकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजाने.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *