जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…

जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…
जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…


काही लोकांना जेवताना घाम येतो. हा घाम हलका असतो किंवा कधीकधी कपाळावर जास्त दिसतो. लोकांना वाटतं की हे गरम जेवणामुळे होतं. पण सामान्य चपाती-भाजी खातानाही अनेकांना घाम येतो. काहींना थंड हवामानातही जेवताना घाम येतो. प्रश्न असा आहे की असं का होतं? हा कुठला गंभीर आजार आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

दिल्ली एम्समधील सिनियर रेजिडेंट डॉ. हिमांशु भदानी यांनी याविषयी सांगितले आहे. ते म्हणाले की, जेवण करताना घाम येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत Gustatory Sweating (चवीमुळे घाम येणे किंवा जेवताना घाम येणे) म्हणतात. हे विशेषतः जास्त मसालेदार जेवण केल्यावर होतं आणि शरीरात घाम येण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्यांचे शरीर गरम असते, त्यांच्यामध्ये हे जास्त दिसतं. काही लोकांमध्ये जेवताना घाम येणे हे सामान्य असतं, तर काहींमध्ये हे अनेक आजारांचे लक्षणही असू शकतं.

मधुमेहाचे (डायबिटीज) लक्षण असू शकतं

डॉ. हिमांशु सांगतात की, जेवताना घाम येणे हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकतं. ज्यांना दीर्घकाळापासून साखर आहे, त्यांच्यात नर्व्ह डॅमेज होऊ शकतात, ज्यामुळे जेवणाच्या वेळी घाम येतो. मात्र हे प्रत्येक केसमध्ये होत नाही. अनेक प्रकरणांमध्ये थायरॉइड आणि हार्मोनल बदलांमुळेही जेवताना घाम येऊ शकतो.

मुलांमध्येही ही समस्या दिसते

डॉ. हिमांशु सांगतात की, मुलांमध्येही जेवण करताना घाम येण्याची समस्या आढळते. मुलांमध्ये हे मुख्यतः gustatory sweating मुळे होतं. सामान्यतः जेव्हा मुल मसालेदार जेवण खातं तेव्हा ते पचवण्यासाठी शरीराचे तापमान वाढतं आणि घाम येतो. पण जर मुल सामान्य जेवण खात असतानाही घाम येत असेल, तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कधी डॉक्टरांना दाखवावं?

-कुठलंही जेवण जेवताना घाम येत असेल

-वजन वेगाने कमी होत असेल

-जेवताना हृदयाचे ठोके वेगाने वाढत असतील

-घाम खूप जास्त येत असेल

बचाव कसा करावा?

-जास्त मसालेदार जेवण टाळा

-कमी आणि हलके जेवण घ्या

-मानसिक ताण घेऊ नका

-दिवसात किमान ७ ग्लास पाणी प्या

हे सामान्यतः नॉर्मल असू शकतं, पण वर सांगितलेली लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *