Video: भर रात्री कब्रिस्तानमधून कॉल, फूड डिलिव्हरी बॉय पोहोचताच… जे घडलं ते पाहून हादरुन जाल

Video: भर रात्री कब्रिस्तानमधून कॉल, फूड डिलिव्हरी बॉय पोहोचताच… जे घडलं ते पाहून हादरुन जाल
Video: भर रात्री कब्रिस्तानमधून कॉल, फूड डिलिव्हरी बॉय पोहोचताच… जे घडलं ते पाहून हादरुन जाल


सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भयाण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. ही घटना एका फूड डिलिव्हरी बॉयशी संबंधित आहे, ज्याला मध्यरात्री बिर्याणीचा ऑर्डर मिळाली होती. पण जेव्हा तो ऑर्डर पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तिथे घर नव्हते, तर कब्रिस्तानाचे मुख्य दरवाजा होता. त्यानंतर जे घडले, ते तुम्ही स्वतः पाहा…

नेमकं काय झालं?

व्हिडीओमध्ये दिसत आहे की रात्री सुमारे १ वाजता एका महिलेने बिर्याणी ऑनलाइन ऑर्डर केली होती. पण जेव्हा फूड डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या दिलेल्या लोकेशनवर पोहोचला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते लोकेशन एखाद्या घराचे नव्हते, तर एका कब्रिस्तानाचे मुख्य गेट होते. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, घाबरलेला डिलिव्हरी बॉय दिलेल्या नंबरवर कॉल करतो. एक महिला त्याचा फोन उचलते. तेव्हा एका महिला त्याला लोकेशन विषयी बोलताना सांगते की, “तुम्हाला समोर कब्रिस्तान दिसतंय का?” डिलिव्हरी बॉयने हो म्हणताच ती म्हणाली, “होय, तिथेच आत या.”

घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयने सांगितले की खूप अंधार आहे आणि त्याला भीती वाटतेय. त्यावर त्या महिलेचे उत्तर होते, “भीती का वाटते? मी आतच आहे.” मग तिने पुढे सांगितले, “समोर जो विजेचा खांब आहे, तिथे येऊन थांबा. माझी गाडी खराब झालीय, मी बाहेर येऊ शकत नाही.” पण कब्रिस्तानातील शांतता आणि त्या महिलेच्या बोलण्याने डिलिव्हरी बॉय इतका घाबरला की त्याने धोका पत्करण्यास नकार दिला आणि म्हणाला, “तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा.”

‘अनसंग हीरो’ की प्रँक?

हा १ मिनिट १३ सेकंदांचा व्हिडिओ इंटरनेटवर नवीन वाद निर्माण करत आहे. नेटिझन्स सतत आपली मते मांडत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की डिलिव्हरी बॉयजच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम. ऊन असो की कडाक्याची थंडी, हे ‘अनसंग हीरोज’ जीव धोक्यात घालून वेळेवर अन्न पोहोचवतात. तर काही यूजर्सांचे मत आहे की हे एखाद्या युट्यूबरने केलेले प्रँक असू शकतो. पण व्हिडिओमधील डिलिव्हरी बॉयची घाबरलेली अवस्था पूर्णपणे खरी वाटत होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *