ट्रम्प यांच्या टॅरिफ कपातीने दिग्गजांचे नशीब पालटले, एका निर्णयाने टाटा, अंबानी आणि मित्तल झाले मालामाल

ट्रम्प यांच्या टॅरिफ कपातीने दिग्गजांचे नशीब पालटले, एका निर्णयाने टाटा, अंबानी आणि मित्तल झाले मालामाल
ट्रम्प यांच्या टॅरिफ कपातीने दिग्गजांचे नशीब पालटले, एका निर्णयाने टाटा, अंबानी आणि मित्तल झाले मालामाल


ट्रम्प यांनी टॅरिफबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला आहे. त्यामुळे देशांच्या दिग्गज कंपन्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील टॉप-१० कंपन्यामध्ये समाविष्ठ असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये ७ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर इन्फोसिस आणि टीसीएसच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. आता एसबीआयच्या शेअरमध्ये सहा टक्के वाढ पाहायला मिळाली. खास बाब म्हणजे या दिग्गज कंपन्यांचे कंबाईंड मार्केट कॅपमध्ये ५.४० लाख कोटीहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. शेअरबाजाराच्या कामकाजाच्या वेळेत ४२०० हून जास्त अंकांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर पाहूयात देशाच्या दिग्गज कंपन्यांना किती फायदा झाला…

दिग्गज कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये जबरदस्त वाढ

1)  रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये मंगळवारी कामकाजाच्या सत्रात ७ टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीचा मार्केट कॅप १,३३,७६८.४९ कोटी रुपयांनी वाढून २०,१४,९८५.१७ कोटी रुपयांवर आले आहे.

2)  एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये कामकाजाच्या सत्रात सुमारे ७ टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आणि बँकेचे मार्केट कॅप ९६,४८८.३८ कोटी रुपये वाढून १५,२३,५००.४९ कोटी रुपयांवर आला.

3)  देशाची मोठी आयटी कंपनपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या शेअरमध्ये ६ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीचे मार्केट कॅप ४१,०६८.९६ वाढून ७,१७,८६५.४९ रुपये झाले आहे.

4) देशाची सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या शेअरमध्ये ५.२८ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्यानंतर कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये ६०,५६३.०२ कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली आणि व्हॅल्युएशन १२,०७,१७२.३३ कोटी रुपये झाले.

5)  देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत समाविष्ठ असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये ४.७२ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.ज्यामुळे या बँकेचे मार्केट कॅप ४५,६३७.६४ कोटी रुपयांनी वाढून १०,१२,८९८.०८ कोटी रुपये झाले आहे.

6) देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या शेअरमध्ये सुमारे ६ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीचा मार्केट कॅप ५६,८०३.७६ कोटी रुपयांनी वाढून १०,०५,९४८.२० कोटी रुपये झाले आहे.

7)  देशाची सर्वात मोठी एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीचे मार्केट कॅप १०,२९१.२१ कोटी रुपये वाढ पाहायला मिळाली आणि व्हॅल्युएशन वाढून ५,६३,८०७.९१ कोटी रुपये झाली आहे.

8)  बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये कामकाजाच्या सत्रात ७.७६ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीचे मार्केट कॅप ४३,६८१.८४ कोटी रुपयांनी वाढून ६,०६,४१२.२३ कोटी रुपये झाला आहे.

9) देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्ये कामकाजाच्या सत्रात ४.८७ टक्के वाढ झाली आणि कंपनीचे मार्केट कॅप २४,७६२.३७ कोटी रुपयांनी वाढून ५,३३,१३४.०५ कोटी रुपये झाले.

10) देशाची सर्वात मोठी इन्फ्रा कंपनी एल एण्ट टीच्या शेअरमध्ये ५ टक्के वाढ पाहायला मिळाली असून कंपनीचे मार्केट २७,२२९.६२ कोटी रुपये वाढून ५,६६,७३२.४४ कोटी रुपये झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *