Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?

Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?
Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?


वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीला सर्वात पवित्र झाड माण्यात आलं आहे, ज्या घरात तुळस असते, त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, घराला आर्थिक स्थौर्य प्राप्त होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुळस ही लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे, त्यामुळे दररोज सकाळी उठून अंघोळीनंतर तुळशीची पूजा करावी, तसेच सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. यामुळे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहतो, घरात कधीही कशाचीही कमी राहत नाही, घरात सदैव सुख, समृद्धी आणि शांती राहाते. एवढंच नाही तर तुळशीचे अनेक आयुर्वेदिक उपाय देखील आहेत. त्यामुळे तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे, अनेकदा असं होतं की घरातील तुळस अचानक वाळून जाते, अनेकजण याला अशुभ संकेत किंवा घरावर येणाऱ्या एखाद्या संकटाची चाहुल समजतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार तो अशुभ संकेत नसतो, तर तुमच्यावर येणारं एखादं मोठं संकट टळल्याचा तो संकेत असतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार असतं, तेव्हा तुमच्या घरातील तुळस ही अचानक वाळते, याचा अर्थ असा की तुमच्यावर येणारं संकट हे तुळशीने आपल्यावर ओढून घेतलं आहे, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं या संकटातून रक्षण केलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्या घरात तुळस असते, त्या घराचं प्रत्येक वाईट शक्तिपासून संरक्षण होतं, ज्या घरात तुळस असते, त्या घरात कधीही नकारात्मक शक्ति प्रवेश करत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे जर तुळस वाळली तर घाबरू जाऊ नये, आपली एखाद्या मोठ्या संकटातून सुटका झाली आहे, असं मानून तुळशी प्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असं वास्तुशास्त्र सांगतं.

वाळलेल्या तुळशीचं काय करायचं?

तुळस जर अचानक वाळली तर त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या मोठ्या संकटातून तुमचं आणि तुमच्या घराचं रक्षण झालं आहे, तुमच्यावर येणारं संकट टळलं आहे, अशा स्थितीमध्ये वाळलेल्या तुळशीच्या सात काड्या घ्यायच्या, त्या देवघरासमोर ठेवा आणि तिथे तुपाचा दिवा लावा, ज्यामुळे सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंचा समूळ नाश होईल, आणि तुम्ही व तुमचं कुटुंब सुरक्षित राहाल, त्यानंतर त्या कुंडीमध्ये तुळशीचं दुसरं रोप लावावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *