शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..

शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..
शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..


अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये त्यांच्या काही सभा असल्याने मुंबई विमानतळाहून सकाळी 8.15 ला ते निघाले होते, बारामतीच्या धावपट्टीजवळ 8.45 ला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगनात अंत्यसंस्कार करण्यात आली. आता त्याचठिकाणी अजित पवार यांचे स्मारक उभारले जाणार आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंब एकत्र आल्याचे बघायला मिळतंय. रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार अजित पवार यांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतानाही दिसत आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यात नुकताच चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली.

यादरम्यान माध्यमांसोबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, घाईघाई विमानाने ते निघाले आणि ही दुर्देवी घटना घडली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्या विचारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. राजकारणातील मोठे नेते अजित पवार होते. राजकीय दृष्टीकोनातून जर तुम्हाला त्यांना आदरांजली द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं.

असे मी पवार परिवाराच्या वतीने बोलेल. पवार परिवारालाही या दु:खद घटनेमुळे आणि या घटनेमुळे प्रचाराला कुठेही जाता आले नाही. त्यामुळे लोकच त्याबाबत समजून घेतील असे वाटते. आमच्या कुटुंबामध्ये कायमच पवार साहेब हे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. जेंव्हा केंव्हा परिवाराला आवशक्ता असते, त्यावेळी पवार साहेब कायमच कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत.

आज अजित पवार नसताना पवार साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. पार्थ, काकी, जय आणि आमच्या सर्वांचेच मत आहे की, अजित दादांचे चांगले स्मारक व्हावे. त्या दृष्टीकोनातून योग्य जागा कोणती जिथे लोकांना येता येईल भेटता येईल, बघता येईल आणि दर्शन घेता येईल, कारण अजित काकांचे काम 35 ते 40 वर्षांचे राजकारणातील होते, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *