Headlines

अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राच्या लेकीचा जन्म; जांभळी त्वचा, अत्यंत कमी वजन, निक जोनासकडून खुलासा

अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राच्या लेकीचा जन्म; जांभळी त्वचा, अत्यंत कमी वजन, निक जोनासकडून खुलासा
अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राच्या लेकीचा जन्म; जांभळी त्वचा, अत्यंत कमी वजन, निक जोनासकडून खुलासा


Priyanka Chopra Daughter: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस याने सांगितलं आहे की, जन्माच्या वेळी मालती हिची अवस्था फार कठीण होती. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये निक याने वडील झाल्यानंतर झालेला आनंद सांगितलं. निक म्हणाला, पहिल्यांदा मालतीला पाहिल्यानंतर प्रचंड आनंद झालेला होता. मुलगी झाल्याचा एक वेगळाच अनुभव होता… लेकीबद्दल बोलताना निक याच्या डोळ्यात पाणी देखील आलं… जन्मानंतर मालती तब्बल 100 दिवस रुग्णालयात होती.

मालती हिच्या जन्मानंतर त्याला आणि प्रियांका चोप्रा हिला आलेल्या अनुभवाबद्दल निक याने मोठं वक्तव्य केलंय. निक म्हणाला, ‘मालतीचा जन्म कठीण परिस्थितीत झाला. ज्याबद्दल मी याआधी देखील सांगितलेलं आहे. मालती एप्रिल महिन्यात घरी येईल असं आम्हाला वाटलं होतं, ज्या वर्षात तिचा जन्म झाला. त्यानंतर एकदा आम्हाला रुग्णालयातून एक फोन आहे… लवकरात लवकर रुग्णालयात या… आम्ही रुग्णालयात पोहोचल्यानंतर जेव्हा मालतीला पाहिलं, तेव्हा तिचं वजन फक्त 765 ग्रॅम होतं…जांभळ्या रंगाची तिची त्वचा पाहिल्यानंतर आम्हाला मोठा धक्का बसला. आयसीयूमध्ये असलेल्या नर्सने मालतीला पुनरुज्जीवित केलं. त्यांनी तिची प्रचंड काळजी घेतली.’

प्रियांका आणि निक करायचे 12 तासांची शिफ्ट…

निकने सांगितलं, ‘मालतीला घरी आणेपर्यंत मी आणि प्रियांकाने रुग्णालयात 12 – 12 तासांची शिफ्ट केली आहे. कोवीड – 19 चे दिवस होते. त्यामुळे प्रियांका आणि मी जवळपास साडे तीन महिने 12 – 12 तास रुग्णालयात शिफ्ट करायचो… मला आज देखील तिचा वास लक्षात आहे… काही आठवणी हृदयद्रावक असतात. “मालतीला साडेतीन महिने दररोज त्रास सहन करावा लागला आणि हळूहळू तिचं वजन वाढू लागलं. सहा वेळा रक्त संक्रमणानंतर तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. साडेतीन महिन्यांनंतर आम्ही तिला घरी आणलं….’ असं देखील निक म्हणाला.

निक जोनस आणि  प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. प्रियांका आणि निक हे इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. प्रियांका आणि निकने 1 डिसेंबर 2018 रोजी ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. निकने सर्वांत आधी 2016 मध्ये ट्विटरवर प्रियांकाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या. लग्नानंतर 5 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निकने सरोगसीच्या माध्यमातून चिमुकल्या पाहुणीचं स्वागत गेलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *