विक्रम मोडणं अशक्य..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चार षटकं टाकत चांगला इकोनॉमी रेट कोण ठेवणार?

विक्रम मोडणं अशक्य..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चार षटकं टाकत चांगला इकोनॉमी रेट कोण ठेवणार?
विक्रम मोडणं अशक्य..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चार षटकं टाकत चांगला इकोनॉमी रेट कोण ठेवणार?


विक्रम मोडणं अशक्य..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चार षटकं टाकत चांगला इकोनॉमी रेट कोण ठेवणार?Image Credit source: TV9 Network/Hindi

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चर्चा होतात त्या विक्रमांच्या… काही विक्रम मोडले जातात, तर काही विक्रम मोडणं कठीण असतात. असाच एक विक्रम गोलंदाजीत झाला आहे. हा विक्रम टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत झाला होता. आता हा विक्रम भविष्यात मोडणं कठीण दिसत आहे. कारण अशी गोलंदाजी करणं शक्य आहे असं वाटत नाही. असं कधीतरीच घडू शकतं आणि ते घडलं आहे. हा विक्रम मोडणं तर कठीण आहे. फार फार तर या विक्रमाची बरोबरी होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल असा विक्रम खरंच झाला आहे का? तर त्याचं उत्तर हो असंच आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर हा विक्रम आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 17 जूनला त्याने हा विक्रम नावावर केला होता.  हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात परत येईल असं वाटत नाही. हा विक्रमच तसा आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने 4 षटकं टाकली. ही चारही षटकं निर्धाव गेली. त्याने एकही धाव दिली नाही आणि तीन विकेट घेतल्या. म्हणजेच त्याचा इकोनॉमी रेट हा 0 होता. खरं तर अशी गोलंदाजी करणं खूपच कठीण आहे. पण लॉकी फर्ग्युसनने हा कारनामा केल्या आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या गोलंदाजाने चार षटकं निर्धाव टाकली तर त्याला त्याच्यापेक्षा एक दोन विकेट जास्त घ्यावा लागतील. पण सध्याचं क्रिकेट पाहता हे काही शक्य नाही.

न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. यावेळी पापुआ न्यू गिनी संघाला 19.4 षटकात 78 धावांवर सर्वबाद केलं होतं. हे लक्ष्य न्यूझीलंडने 12.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं होतं. हा सामना न्यूझीलंडने 7 विकेटने जिंकला. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही 20 संघ सहभागी झाले आहेत. काही दुबळे संघ आहेत. एक वेळ फलंदाजीचे काही विक्रम मोडणं सोपं होईल. पण गोलंदाजीत दुबळ्या संघांविरुद्ध चांगली कामगिरी करणंही कठीण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *